Girl In Golden Temple: पंजाबच्या प्रसिद्धा गोल्डन टेम्पल अर्थात सुवर्ण मंदिरात (Golden Temple) जाण्यापासून एका मुलीला रोखल्याची घटना समोर आली आहे. चेहऱ्यावर तिरंगा (Tricolor) पेंट केल्याने मंदिरात जाण्यापासून रोखल्याचा दावा या मुलीने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. हा व्हिडिओ या मुलीने स्वत: शूट केला आहे. या प्रकरणावर शिख गुरुद्वारा समितीची प्रतिक्रियाही आली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत ही मुलगी हरियाणा (Hariyana) भाषेत बोलताना ऐकायला येतंय. तिच्याबरोबर आणखी एक व्यक्ती आहे. या दोघांबरोबर मंदिरातील एक कर्मचारी वाद घालताना दिसत असून तो यांना मंदिरात जाण्यापासून रोखत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
'हा पंजाब आहे, भारत नाही'
ही मुलगी आपल्या एका साथीदाराबरोबर मंदिरात गेली, पण मंदिराच्या बाहेरच एका कर्मचाऱ्याने त्यांना रोखलं. यावर मुलीबरोबर असलेल्या व्यक्तीने त्यांना थांबवलं. थांबवण्याचं कारण विचारल्यावर त्या कर्मचाऱ्याने या मुलीच्या चेहऱ्यावर तिरंगा पेंट केल्याने रोखल्याचं उत्तर मिळालं. इतकंच नाही तर हा पंजाब आहे, भारत नाही असं उद्धटपणे वक्तव्यही त्याने केलं. यावर त्या मुलीने आणि तिच्या साथदाराने मंदिरातील कर्मचाऱ्याबरोबर वाद घातला. हा संपूर्ण प्रकार त्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
व्हिडिओ बनवल्याने संतप्त
मुलगी व्हिडिओ बनवत असल्याचं पाहिल्यानंतर तो कर्मचारी चांगलाच संतापला. त्याने त्या मुलीचा मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला असून त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे महासचिव गुरचरण सिंह ग्रेवाल यांनी या प्रकरणावर माफी मागितली आहे.
Khalistanis taking over Golden Temple!
— JIX5A (@JIX5A) April 17, 2023
Woman denied entry to Golden Temple because she had a India flag painted on her face! The man who denied her entry into Golden Temple said this is Punjab, not India @AmitShah pic.twitter.com/bnzUzEqLvM
सुवर्ण मंदिराची माहिती
सुवर्णमंदिर हे मंदिर शीख धर्मीयांच पवित्र धार्मिक स्थळ आणि प्रमुख गुरुद्वार म्हणून ओळखलं जातं. भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहरामध्ये हे प्रसिद्ध मंदिर आहे. सुवर्ण मंदिरात दररोज जवळपास हजारो पेक्षा अधिक भक्त आणि पर्यटक येतात. एकोणिसाव्या शतकामध्ये अफगाण हल्लेखोरांनी हे मंदिर नष्ट केलं होतं . पण त्यानंततर महाराजा रणजीत सिंह यांनी हे मंदिर पुन्हा उभारून त्याला सोन्याचा मुलामा दिला. दररोज हजार लोक मंदिरातील लंगरमध्ये प्रसाद ग्रहण करतात. फक्त भोजनच नाहीतर मंदिरात येणाऱ्या लोकांच्या आश्रयाची सोय देखील इथं केली जाते.