Marathi News> भारत
Advertisement

सप्तपदी वगैरे ठीक; या नवरा- नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच मारले Push Ups; पाहा भन्नाट व्हिडीओ

लग्नामध्ये हे असं काही होईल, याची पाहुण्यांनीही अपेक्षा केली नव्हती... 

सप्तपदी वगैरे ठीक; या नवरा- नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच मारले Push Ups; पाहा भन्नाट व्हिडीओ

मुंबई : जीवनात काही दिवस हे अगदी खास असतात. या दिवसांच्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशाच असतात. अशाच दिवसांपैकी एक म्हणजे लग्नाचा दिवस. 

कोणा एका अतिशय प्रिय व्यक्तीसोबत आयुष्यभराचा प्रवास सुरु करुन देणारा हा दिवस. हा दिवस खास असावा असं सर्वांनाच वाटत असतं. आणि मग सुरु होतो अट्टहास, काहीतरी 'खास' करण्याचा. इथंच कल्पना शक्तीला चालना मिळते आणि काही अफलातून प्रसंगांची घडी बसते. 

सध्या हे सारं चित्र उभा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववविवाहित जोडी कपल डान्स, किंवा कपल फोटोसाठी पोझ वगैरे देत नसून एकमेकांना फिटनेस चॅलेंज देताना दिसत आहेत. 

मुलीला सासरी पाठवण्याआधी वडिलांनी असं काही केलं; व्हिडिओ पाहून हैराण झाले लोक

 

लग्नाच्याच (Wedding) स्टेजवर पुश अप्स मारत या जोडीनं सर्वांनाच थक्क केलं आहे. विवाहसोहळ्यातील पेहरावातही अगदी सहजपणे त्यांनी केलेली ही करामत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारों नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर, त्यावर अनेकांनी कमेंटही केली आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांची साथ देण्यासाठी वचनबद्ध असणाऱ्या जोड्यांनी शारीरिक सुदृढतेच्या वाटेवरही असं एकत्र चालणं केव्हाही फायद्याचं.... नाही का? 

Read More