Marathi News> भारत
Advertisement

'तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल' - गांगुली

तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. यापूर्वी सौरव गांगुलीने देखील एकदा आपलं शर्ट उतरवलं ...

'तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल' - गांगुली

भारत : माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने म्हटलं आहे की, टीम इंडिया पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेता ठरली, तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. यापूर्वी सौरव गांगुलीने देखील एकदा आपलं शर्ट उतरवलं आहे. भारतीय क्रिकेटची आक्रमकतेच्या इतिहासात हा देखील एक अध्याय नोंदवला गेला आहे. इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर टार्गेट पूर्ण करताना १६ वर्षाआधी २००२ मध्ये टीम इंडियाने नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करताना, आपलं शर्ट काढून हवेत भिरकावलं होतं.

सौरव गांगुलीने म्हटलं आहे, मी गॅरंटी देऊ शकतो की....

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार सौरव गांगुलीने म्हटलं आहे, मी गारंटी देऊ शकतो की, कोहली २०१९ मधील लॉर्डस मैदानावरील विश्वचषक कप जिंकेल आणि आम्हाला आमचे कॅमेरे तयार ठेवावे लागतील, कारण विराटकडे सिक्सपॅक आहेत. मी अजिबात हैराण होणार नाही, जर विराट ऑक्सफर्ड स्ट्रीटवर ट्रॉफी घेऊन शर्ट काढून फिरेल.

विराट सोबत शर्ट काढून हा प्लेअर देखील फिरणार....

सौरव गांगुली म्हणतो, आणि त्यांच्या सोबत कोण कोण असेल हे सुद्धा मी सांगू शकतो, तर असेल हार्दिक पंड्या.

Read More