Marathi News> भारत
Advertisement

'26 अप्रैल को है मेरी शादी...'; 10 रुपयाच्या व्हायरल नोटेचा सोशलमीडियावर धुमाकूळ

Viral Note | सध्या सोशल मीडियावर 10 रुपयांची नोट व्हायरल होत आहे, ज्यावर एका मुलीने तिच्या प्रियकरासाठी मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये त्‍याने 26 एप्रिलला आपले लग्‍न होत असल्‍याचे म्‍हटले आहे.. 

'26 अप्रैल को है मेरी शादी...'; 10 रुपयाच्या व्हायरल नोटेचा सोशलमीडियावर धुमाकूळ

मुंबई : Girlfriend Wrote to boyfriend On Rs 10 Note : काही वर्षांपूर्वी 'सोनम गुप्ता बेवफा है' लिहिलेली एक नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर लोकांनी त्यावर असंख्य मीम्स बनवले होते. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या सोशलमीडियावर शेअर होणाऱ्या 10 रुपयांच्या नोटेवर पेनने लिहिलंय की, 'विशाल, मेरी शादी 26 अप्रैल को है. मुझे भाग के ले जाना, आई लव यू. तुम्हारी कुसुम.'

fallbacks

10 रुपयांची नोट व्हायरल 

व्हायरल होणाऱ्या 10 रुपयांच्या नोटवर लिहलंय की, विशाल, 26 एप्रिलला माझं लग्न आहे. मला पळवून घेऊन जा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझीच कुसूम.

ही नोट सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, युजर्स यावर असंख्य मीम्स आणि विनोद शेअर करीत आहेत. अनेक युजर्स आपल्या मित्रांना हा फोटो पाठवत आहेत. सोशलमीडियाच्या माध्यमातून ही नोट तुमच्यापर्यंतपण पोहचली असेल तर, तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया दिली हे आम्हाला नक्की सांगा... 

Read More