मुंबई : काही दिवसांपूर्वी 10 रुपयांची नोट चर्चेत आली होती, ज्यामध्ये लिहिले होते, 'विशाल, माझे लग्न 26 एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे कुसुम.' ही नोट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स केल्या. एवढंच काय तर लोकांनी त्यांच्या ओळखीच्या सर्वच विशालपर्यंत पोहोचवल्या, ज्याला बरेच विशाल कंटाळले होते. परंतु अखेर कुसुमच्या हा मेसेज तिच्या खऱ्या विशालपर्यंत पोहोचलाच.
कुसुंमच्या मेसेजचा हा ट्रेंड अजून संपला नव्हता की, आणखी एक 10 रुपयांची नोट व्हायरल होऊ लागली, ज्यावरती विशालचे उत्तर आहे.
सोशल मीडियावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला जेवढा उत्साह आला होता, तेवढा उत्साह नेटकऱ्यांना विशाल आणि कुसुमच्या प्रेम कहाणीचा होता. जर तुम्हाला त्यांची प्रेमकहाणी माहीत नसेल, तर तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजून घ्यावे लागेल.
काही दिवसांपूर्वी कुसुमने तिचा प्रियकर विशालसाठी 10 रुपयांच्या नोटेवर एक संदेश लिहिला होता, जो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. आता ट्विटरवर 10 रुपयांच्या नोटेचे आणखी फोटो समोर आले आहे, ज्यात विशालने कुसुमला उत्तर दिले आहे.
Ek pyar Aisa bhi.
— AJAY YADAV (@AJAYYAD46374764) April 23, 2022
Mil gya kusum ka jvab.
ViShal 26April aayega#LOVEDIVE pic.twitter.com/MGVV0QJX4B
'कुसुम, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला घ्यायला येईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विशाल.' त्यांचं हे प्रेम पाहून अनेकांना आश्चर्यवाटत आहे.
एकदिवस कुसुमचा मेसेज काय येतो आणि काही दिवसात विशाल तिला रिप्लाय काय देतो. ज्यामुळे लोकांमध्ये आता या दोघांच प्रेम कुठपर्यंत पोहोचतं, आणि हे दोन प्रेमी एकमेंकांना भेटू शकतील का, हे पाहण्यासाठी उत्सुक्ता आहे.
दोन प्रेमी एकमेकांना भेटू शकतील की, नाही हे पाहण्यासाठी इंटरनेट आता 26 एप्रिलची वाट पाहत आहे.
या कथेमागील सत्य काय आहे, हे सध्या तरी कोणालाच माहीत नाही. खरंच कुणी कुसुम आहे का, जिने तिचा प्रियकर विशालला मेसेज लिहिला. किंवा ती फक्त व्हायरल सामग्री आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.