Marathi News> भारत
Advertisement

Amazone पाठोपाठ Vodafone मधून नोकर कपात; तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

Recession : अॅमेझोनमधून 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची कंपनीने घोषणा केल्यानंतर काही तासातच वोडाफोननेही कर्मचारी कपत करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

Amazone पाठोपाठ Vodafone मधून नोकर कपात; तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

Vodafone Layoff : जगावरचं मंदीचं मळभ अजूनही दूर झालेलं नाही. अजूनही मोठमोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीचं (Staff Reduction) सत्र सूरुच आहे. अॅमेझॉनने (Amazon) 500 भारतीय कर्मचाऱ्यांन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याला 24 तास उलटत नाहीत तोच जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) असलेल्या वोडाफोनने (Vodafone) तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ मार्गारिटा डेला वैले ( Margherita Della Valle) यांनी बदलाची गरज असल्याचं सांगत हा निर्णय घेतला गेल्याचं सांगितलं.

का घेतला निर्णय?
गेल्या काही महिन्यात कंपनीची कामगिरी चांगली झालेली नाही. कंपनीची कामगिरी सुधारण्यासाठी काही बदलाची गरज आहे. सध्याच्या काळात वोडाफोन कंपनीत जगभरात 1,04,000 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. नोकर कपातीची संपूर्ण कपात येत्या 3 वर्षात पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. 

कंपनीच्या एकूण उत्पन्नात घट
कंपनीने केलेल्या दाव्यामुसार एकूण उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीचं सध्याचं उत्पन्न 1.3 टक्के म्हणजे 14.7 अब्ज यूरो इतकं आहे. जे मुळात अर्ध्यहून कमी आहे. कंपनीने सांगितले की पुढील वर्षी उत्पन्नात आणखी घट अपेक्षित आहे, जी 13.3 अब्ज युरोपर्यंत खाली येऊ शकते.

भारतात काय परिणाम होणार?
भारतात वोडाफोन आणि आयडिया (Vodafone-Idea) कंपनी मिळून काम करत आहेत. भारतातही वोडानफोन-आयडीयाचं उत्पन्न घटलं आहे. वोडाफोन-आयडीया जॉईंट व्हेंचर लवकरच अग्रेसर होईल असा विश्वास बिर्ला ग्रुपने व्यक्त केला आहे. पण कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या वोडाफोन-आयडीयासाठी हे आव्हान तितकंच सोप नाहीए. वोडाफोनच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा भारतातही परिणाम जाणवू शकतो. भारतात काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. पण कर्मचारी कपातीचा निर्णय बिर्ला ग्रूपच्या सहमतीनंतरच घेतला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. 

कंपनीच्या शेअरवर परिणाम
वोडाफोन कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद त्यांच्या शेअर्सवरही दिसले आहेत. वोडाफोनच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घच झाल्याचं पाहिला मिळतंय.

अॅमेझोनमधून कर्मचारी कपात
सिअॅटलमधील टेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अॅमेझोन कंपनीनं 500 भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. येत्या काळातही कर्मचारीची प्रक्रिया सुरुच राहणार असल्याची शक्यता आहे. अॅमेझॉनमधल्या वेब सर्विस, ह्युमन रिसोर्स, सपोर्ट फंक्शन या आणि अशा इतर काही विभागांतील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकावं लागू शकतं.

Read More