Marathi News> भारत
Advertisement

वाघा बॉर्डरवर सूर्यास्तापूर्वीची 'बिटींग द रिट्रीट'

1959 सालापासून सुरू असलेला हा सोहळा जगभरात नावाजला जातो. 

वाघा बॉर्डरवर सूर्यास्तापूर्वीची 'बिटींग द रिट्रीट'

वाघा बॉर्डर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाघा बॉर्डरवर सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवण्याआधी दोन्ही देशांतर्फे लष्करी कवायत केली जाते. त्याला बिटींग द रिट्रीट असंही म्हटलं जातं. 

1959 सालापासून सुरू असलेला हा सोहळा

1959 सालापासून सुरू असलेला हा सोहळा जगभरात नावाजला जातो. पण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याला विशेष महत्त्व असतं... प्रजासत्ताक दिनाला ही परेड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी इथे उसळते.

बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स

भारताचे बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्सचे जवान वैशिष्ट्यपूर्ण कवायत करत आमने सामने येतात. दोन्ही देशांचे ध्वज सन्मानाने खाली उतरवण्यात येतात. त्यानंतर दोन्ही देशांचे जवान एकमेकांशी हस्तांदोलन करून बॉर्डर गेट लावून घेतात.

शत्रूत्व या परेडमध्ये हावभावातून दिसून येतं

दोन्ही देशातलं शत्रूत्व या परेडमध्ये हावभावातून दिसून येतंच पण त्याचसोबत शेजारी देशाविषयी असलेला शेजारधर्म, बंधूता दर्शवणाऱ्या भावनाही या आक्रमक परेडमधून मांडण्यात येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अशी दोन गेट आहेत. त्यातील वाघा म्हणजेच अट्टारी बॉर्डर प्रसिद्ध आहे. मात्र अशीच परेड पंजाबच्याच फिरोजपूर बॉर्डर गेटवरही केली जाते. 

Read More