Marathi News> भारत
Advertisement

महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेल

 महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीन यांच्या नावावर आहे. जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण? 

 महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेल
Overview of Waqf Properties in India : वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो. भारतात अनेक जमीनींवर वक्फ बोर्डाने दावा केला. यामुळे हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली. वक्फ काद्यात सुधारणा करण्यासाठी  वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे समजते. भारतात एकूण 32  वक्फ बोर्ड आहेत. 
 

हे देखील वाचा...पुण्यातील Top 10 श्रीमंत व्यक्ती; पहिलं नाव नाही तर बाकीची नावं वाचून शॉक व्हाल

 
राज्यनिहाय आकडेवारी पाहिली असता सर्वात जास्त जमीन उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात (सुन्नी) 2.17 लाख मालमत्ता वक्फच्या नावावर आहे. याची एकूण क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर पश्चिम बंगाल (80,480 मालमत्ता), पंजाब (75,956), तामिळनाडू (66,092) आणि कर्नाटक (62,830) यांचा क्रमांक लागतो.  राज्यांमध्ये 32 ठिकाणी  8,72,328 मालमत्ता आहेत, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ  38,16,291.788   एकर आहे.
 

हे देखील वाचा... कायद्यातील 'या' एका कलमामुळे वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो

 
14 मार्च 2025 पर्यंत, वक्फ मॅनेजमेंट सिस्टम इन इंडिया (WAMSI) पोर्टलवर वक्फ बोर्डाची मालमत्ता आणि जमीनीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, 38 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या 8.72  लाख नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत. यापैकी 4.02 लाख वापरकर्ते वक्फ आहेत.  9,292 प्रकरणांसाठी मालकी हक्काची कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत. फक्त  1,083  प्रकरणांमध्ये संबंधित वक्फ कागदपत्रे आहेत.
 

विविध राज्यांमधील वक्फ बोर्डाच्या जमीनी आणि मालमत्ता

  1. अंदमान आणि निकोबार वक्फ बोर्ड 151 मालमत्ता आणि 178.09 एकर जमीन
  2. आंध्र प्रदेश राज्य वक्फ बोर्ड 14,685 मालमत्ता आणि 78, 299 एकर जमीन
  3. आसाम वक्फ बोर्ड  2654 मालमत्ता 6,618 एकर जमीन
  4. बिहार राज्य (शिया) वक्फ बोर्ड 1750 मालमत्ता 29, 009.52 एकर जमीन
  5. बिहार राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 6866 मालमत्ता 1,69, 344.82 एकर जमीन
  6. चंदीगड वक्फ बोर्ड 34 मालमत्ता 23.36 एकर जमीन
  7. छत्तीसगड राज्य वक्फ बोर्ड 4230 मालमत्ता आणि 12,347 एकर जमीन
  8. दादरा आणि नगर हवेली वक्फ बोर्ड 30 मालमत्ता आणि 441 एकर जमीन
  9. दिल्ली वक्फ बोर्ड 1047 मालमत्ता आणि 28.9 एकर जमीन
  10. गुजरात राज्य वक्फ बोर्ड 39940 मालमत्ता आणि 86,438.95 एकर जमीन
  11. हरियाणा वक्फ बोर्ड 23,267 मालमत्ता आणि 36,482.4 एकर जमीन
  12. हिमाचल प्रदेश वक्फ बोर्ड 5,343 मालमत्ता आणि 8,727.6 एकर जमीन
  13. जम्मू आणि काश्मीर औकाफ बोर्ड 32, 533 मालमत्ता  3,50,300.75 एकर जमीन
  14. झारखंड राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 698 मालमत्ता 1,084.76 एकर जमीन
  15. कर्नाटक राज्य औकाफ बोर्ड 62,830 मालमत्ता आणि 5,96,516.61 एकर जमीन
  16. केरळ राज्य वक्फ बोर्ड 53,282 मालमत्ता आणि 36,167.21 एकर जमीन
  17. लक्षद्वीप राज्य वक्फ बोर्ड 896 मालमत्ता आणि 143.81 एकर जमीन
  18. मध्य प्रदेश वक्फ बोर्ड 33,472 मालमत्ता आणि  6,79,072.39 एकर जमीन
  19. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड 36701 मालमत्ता आणि  20,1105.17 एकर जमीन
  20. मणिपूर राज्य वक्फ बोर्ड 991 मालमत्ता आणि   10,077.44 एकर जमीन
  21. मेघालय राज्य वक्फ बोर्ड 58 मालमत्ता आणि 889.07 एकर जमीन
  22. ओडिशा वक्फ बोर्ड 10,314 मालमत्ता आणि  28,714.64 एकर जमीन
  23. पुद्दुचेरी राज्य वक्फ बोर्ड 693 मालमत्ता आणि  352.67 एकर जमीन
  24. पंजाब वक्फ बोर्ड 75,965 मालमत्ता आणि  72,867.89 एकर जमीन
  25. राजस्थान मुस्लिम वक्फ बोर्ड 30,895 मालमत्ता आणि 5,09,725.57 एकर जमीन
  26. तामिळनाडू वक्फ बोर्ड 66,092 मालमत्ता आणि 6,55,003.2 एकर जमीन
  27. तेलंगणा राज्य वक्फ बोर्ड 45,682 मालमत्ता आणि  1,43,305.89 एकर जमीन
  28. त्रिपुरा वक्फ बोर्ड 2,841 मालमत्ता आणि  1,015.73 एकर जमीन
  29. उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड 15,368 मालमत्ता आणि  20,483 एकर जमीन
  30. उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड 2,17,161 एकर जमीन
  31. उत्तराखंड वक्फ बोर्ड 5,388 मालमत्ता आणि 82,011.84 एकर जमीन  
Read More