Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या

दिल्ली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरं आणि दुकांनांत चोरीच्या घटना होत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

VIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या

नवी दिल्ली : दिल्ली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरं आणि दुकांनांत चोरीच्या घटना होत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शनिवारी सकाळी एका चोराने साई बाबा मंदिरातील मुकूट चोरला आहे. ही संपूर्ण गटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मंदिरातील मुकूट चोरी

सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती चेहऱ्यावर मास्क लावून मंदिरात प्रवेश करतो. त्यानंतर साई बाबांच्या मुर्तीवर ठेवलेला मुकूट चोरी करुन अगदी सहजपणे निघून जातो.

शनिवारी सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करत आहेत.

यापूर्वीही घडलीय अशीच घटना

साई मंदिरात चोरी झाल्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मयुर विहार परिसरात असलेल्या एका मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला होता.

Read More