मुंबई : आयुष्यातील प्रत्येक दिवस हा अधिक खास आणि तितकाच अविस्मरणीय असतो. त्यातही तो लग्नाचा दिवस असेल तर त्याचं महत्त्वं हे जरा जास्तच असतं. कोणी फोटोशूट करत, कोणी मित्रमंडळींच्या साथीने अनोखी शक्कल लढवत या दिवसाला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. तर, कोणी त्यासाठी नकळतपणे थेट सोशल मीडियाचीही मदत घेतात. असा हा खास दिवस आणखी खास करण्यासाठी म्हणून नुकतंच एका जोडीने भन्नाट आयडीयाची कल्पना लढवली आणि पाहुण्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.
मुंबईच्या या जोडीच्या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनीच शेअर केला आहे. मुख्य म्हणजे तो खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. वीणा आणि अनंत अशी या नवविवाहितांची नावं आहेत. खुद्द अनंतनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला. सोबतच त्याने या व्हिडिओला मिळणारं प्रेम पाहता सर्वांचेच आभारही मानले.
My lovely wife, @veenaparasher and me, singing on our Wedding.
— Anant (@anantmt) April 21, 2019
We want to thank all of you for the love, blessings and messages that we had been receiving since yesterday after our video has been shared on Social Media/Whatsapp.
As requested, Sharing the original full Video here. pic.twitter.com/f28W8jHsRQ
हा आहे त्या गाण्याचा मुळ व्हिडिओ...
'पंजाबी टप्पे' या प्रकारातील गाण्याचं सादरीकरण करणाऱ्या वीणा आणि अनंतचा हा अंदाज एका वेगळ्याच प्रकारचे सुरेल असे #CoupleGoals देत आहेत. मुळात या प्रकारच्या गाण्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर अनेकांचं लक्ष वेधत आहे. ज्यामध्ये गझल गायक जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेल्या कोठे ते आ... हे गाणं सादर करताना दिसत आहेत. प्रेमी युगुलांमध्ये होणारी विनोदी आणि तितकीच सुरेख असे संवाद आणि त्यांनी शाब्दिक जुळवाजुळव करत केलेली ही सुरेल गुंफण प्रेक्षकांसाठी परवणी होतीच. पण, त्यातही आता या नवविवाहित जोडीच्या अंदाजाने हे पंजाबी टप्पे गात, लग्नसोहळ्यातील नवा ट्रेंडच जणू सर्वांसमोर आणला असं, म्हणायला हरकत नाही.