Marathi News> भारत
Advertisement

नवरदेवाच्या आईनं गाजवलं लग्न; धमाकेदार डान्स Video पाहून सारेच हैराण

काही मंडळींमध्ये दडलेल्या अनेक कला अशाच समारंभांच्या वेळी सर्वांना पाहण्याची संधी मिळते

नवरदेवाच्या आईनं गाजवलं लग्न; धमाकेदार डान्स Video पाहून सारेच हैराण

नवी दिल्ली : लग्न सोहळे म्हटलं की, धमाल, मस्ती आणि एकच कल्ला पाहायला मिळतो. पाहुण्या मंडळींमध्ये दडलेल्या अनेक कला अशाच समारंभांच्या वेळी सर्वांना पाहण्याची संधी मिळते. अशा या वातावरपणात, विशेषत: लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाच्या आईच्या शब्दाला बरंच वजन असतं. 

नवरदेवाई आई, म्हटली की जरा धीरगंभीर, परिस्थिती पाहून सर्वांशी संवाद साधणाऱ्या आणि मुख्य म्हणजे सासू या शब्दाला शोभेल असं वागणाऱ्या व्यक्तीचाच चेहरा सर्वांमोर उभा राहतो. पण, सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील काकुंना पाहून मात्र हे सारे पूर्वग्रह दूर होत आहेत. 

हाय रामा ये क्या हुआ? अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीत मद्यधुंद अवस्थेत राम गोपाल वर्मांचा डान्स? 

 

i.am.sanam नावाच्या एका इन्स्टा हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्य़े सुनबाई घरात, सासुबाई जोरात.... असंच काहीसं दृश्य पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये विवाहसोहळ्यामध्ये स्टेजवर आपला मुलगा, सून आणि इतर नातेवाईकांची उपस्थिती असताना सासूबाई मोठ्या आवेगात भांगडा नृत्य करण्यास सुरुवात करतात. उतरत्य़ा वयातही भांगड्यावर धरलेला ठेका आणि त्यांचा अफलातून डान्स पाहून सोशल मीडिया युजर्सही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@i.am.sanam)

आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. मुलाच्या लग्नात आईनं केलेली ही धमाल पाहून अनेकांनाच हेवाही वाटत आहे. 

Read More