Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई

तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

VIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई

नवी दिल्ली : तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

हरियाणातील एक महिला आपल्या पतीचं संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एका महिलेने हातात काठी घेत आपल्या पतीवर हल्ला करणाऱ्यांची धुलाई केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. गावातील एका व्यक्तीला काहीजण मिळून मारहाण करत आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहताच त्या इसमाची पत्नी आपल्या पतीचा बचाव करण्यास समोर आली.

पतीला होत असलेली मारहाण पाहून संतापलेल्या पत्नीने हल्लेखोरांची धुलाई करण्यास सुरुवात केली. महिलेचा आक्रमक अवतार पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.

Read More