Marathi News> भारत
Advertisement

Weather Update: राजधानीत वाढली कुडकुडणारी थंडी; तर 'या' भागांत पावसाचा अंदाज

24 December Weather Update: संपूर्ण उत्तर भारतात थंडीसह धुकं अधिक प्रमाणात असून लोकांना ये-जा करताना अडचणी येताना दिसतायत. दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी सतत वाढत आहे. 

Weather Update: राजधानीत वाढली कुडकुडणारी थंडी; तर 'या' भागांत पावसाचा अंदाज

24 December Weather Update: भारताच्या बहुतांश भागात आता थंडी वाढली आहे. याशिवाय डोंगरावर बर्फवृष्टी सुरू असल्याचंही दिसून येतंय. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीनंतर वातावरण एक आहे. संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आणि धुकं दिसून येतंय. तर दक्षिण भारतात पावसाचा जोर आहे. राजस्थानमधील माउंट अबूमध्ये किमान तापमानात 1 अंश आहे. 

उत्तर भारतातही थंडीची तीव्रता एवढी वाढताना दिसतेय. हरियाणातील कैथलमध्ये पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यासोबत दाट धुक्याच्या रस्त्यावरून चालणे कठीण होताना दिसतंय. या भागांमध्ये हवामान कसं असणार ते जाणून घेऊया.

संपूर्ण उत्तर भारतात थंडीसह धुकं अधिक प्रमाणात असून लोकांना ये-जा करताना अडचणी येताना दिसतायत. दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी सतत वाढत आहे. दिल्लीत दृश्यमानता खूपच कमी होती. थंडीसोबतच नोएडा आणि गाझियाबादमध्ये धुक्याची चादर दिसून येतेय. 

उत्तर प्रदेश गारठलं

उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्येही प्रचंड गारवा दिसून येतोय. एकीकडे कडाक्याची थंडी तर दुसरीकडे धुकं देखील आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये हवामानाचे विविध रंग पाहायला मिळतायत. 

महाराष्ट्रात कसं आहे वातावरण?

राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून 25 डिसेंबर मध्य महाराष्ट्र, विदर्भात किंचित तापमानात घट होणार आहे. राज्यात थंडीचा कडाका जरा कमी होणार आहे. राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झालंय. 

या ठिकाणी पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानुसार, आज जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीपमध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय 24 आणि 25 डिसेंबर रोजी पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आलाय.

Read More