Marathi News> भारत
Advertisement

Weather Update : देशभरातील 'या' भागात ५ जानेवारीपर्यंत पडणार पाऊस

अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम

Weather Update : देशभरातील 'या' भागात ५ जानेवारीपर्यंत पडणार पाऊस

मुंबई : हवामान खात्याने (India Meteorological Department)देशभरात येत्या तीन दिवसात भरपूर पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यातप्रमाणे गारा  (Hailstorm) पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. याचप्रमाणे आगामी दोन दिवसांत अशाच पद्धतीचं वातावरण असल्याची शक्यता वर्तवली आहे. 

दिल्लीप्रमाणेच मुंबईतही रविवारी रात्री हलका पाऊस पडला. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण होतं. अशा अवेळी पावसामुळे पिक खराब होण्याची दाट शक्यता आहे.

भारतात पाच जानेवारीपर्यंत भरपूर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच भारतात गारा पडणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत रविवारी माहिती दिली आहे.

IMD च्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस पडणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली पावसाच्या हलक्या सरी...6 आणि 7 जानेवारीला कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज 

Read More