Marathi News> भारत
Advertisement

लग्नाच्या वरातीत घोड्याची सटकली, अनेकांना चिरडलं, पाहा VIDEO

वरातीत असलेला घोडा अचानक उधळला आणि पुढे जे घडलं ते... Video पाहाच

लग्नाच्या वरातीत घोड्याची सटकली, अनेकांना चिरडलं, पाहा VIDEO

Viral Video : काय ते लग्न.... काय तो डीजे... आणि काय तो डान्स.... सगळं एकदम ओक्केमध्ये सुरू होतं... पण पुढे जे घडलं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल. 

डीजे एकदम फुल्ल व्हॉल्युममध्ये सुरू होता, आणि वऱ्हाडी पण हात वर करुन जोरदार डान्स करत होते. तेवढ्यात एकच आरडाओरडा सुरू झाला. वरातीत असलेला घोडा अचानक उधळला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं घोडा दोन पाय वर करुन डीजेच्या तालावर डान्सच करतोय.

त्यामुळे वऱ्हाडी मंडळींनी घोड्याबरोबर त्यांचा डान्स सुरूच ठेवला. नंतर मात्र घोड्याची पार सटकली. घोडा दोन पाय वर उचलून उधळला आणि जो दिसेल त्याला पायाखाली चिरडू लागला.  घोड्यानं लहान मुलं, वृद्ध, अनेकांना चिरडायला सुरुवात केली. 

अनेक जण घोड्याच्या पायाखाली आले, तर काहींना घोड्याच्या लाथांचा प्रसाद खावा लागला. हा सर्व थरार पाहून वऱ्हाडींना पळता भुई थोडी झाली. सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या हमीरपूरचा असल्याचं समजतंय.

तेव्हा तुम्ही लग्नात घोडा बोलावणार असाल तर डीजेच्या तालावर नाचताना जरा सावधच राहा.

Read More