Wedding Funny Viral Video: लग्न हा नवरदेव आणि नवरी या दोघांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईक सर्व गोळा होतात. विधीप्रमाणे हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यादरम्यान अनेक मजेशीर प्रसंग घडतात. लग्नाच्या विधींदरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. होणाऱ्या बायकोला नवरदेव वरमाला घालताना मस्करीच्या मूडमध्ये होता. पण वधूला राग अनावर झाला आणि भलतंच काहीतरी घडलं. नवरदेवाला अशी अद्दल घडली की पुढच्या 7 जन्मात हीच पत्नी मिळाली तरी तो असं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस करणार नाही.
लग्न समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. ज्यात नवरी नवऱ्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतेय. पण नवरदेव दरवेळी मागे हटतोय. मग रागाच्या भरात वधूने वराला लग्नसमारंभातच आपली ताकद दाखवून दिली.
ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांसमोर घडली. लग्नात आलेल्या कोणीतरी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. @me_sunitaa नावाच्या एका एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये नवरीचा राग आणि वराची फजिती स्पष्टपणे दिसतेय. वधूने वराला मारताच तिथे उपस्थित असलेले लोकदेखील पाहतच राहीले.
सर्व लोकांच्यासमोर लग्नाच्या स्टेजवर नवरीने नवऱ्याला खाली पाडलं. वराला पाडल्यानंतर वधूची प्रतिक्रिया पाहून सर्व पाहुणे स्तब्ध झाले. ती रागाने काहीतरी बोलली आणि मग स्टेजवरून खाली आली. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. काही लोक तोंड धरुन हसत होते. तर काही लोक असं करायची काय गरज होती म्हणत वराला त्याच्या कृत्याबद्दल शिव्या देत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वराला धडा मिळाला, असे लोकं म्हणतायत.
जयमाला के समय ज्यादा होशियारी न करें,दुल्हन जो कर रही है करने दें, नहीं तो लेने के देने पड़ सकते हैं। pic.twitter.com/8KSFGTW3az
— Sunita Mishra (@me_sunitaa) May 16, 2025
हा व्हायरल व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. लग्नासारख्या खास प्रसंगी वर असा खोडसाळपणा कसा करू शकतो याचे लोकांना आश्चर्य वाटतंय. लग्न समारंभात घडलेल्या या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडालीय. या व्हिडिओवर यूजर्स मजेदार कमेंट्स करतायत. आणि वधूच्या धाडसाचे कौतुक करतायत.