Marathi News> भारत
Advertisement

अमराठी तरुणीला मराठी परंपरेची भुरळ, लग्नात लेझीमवर डान्स करत जिंकले लोकांचे मन

पूर्वीच्या काळी, नववधू लाजायच्या किंवा आपल्या लग्नात रडायच्या, परंतु...

अमराठी तरुणीला मराठी परंपरेची भुरळ, लग्नात लेझीमवर डान्स करत जिंकले लोकांचे मन

मुंबई : सोशल मीडियावर सध्या आपल्याला सर्वत्र लग्नाचेच व्हिडीओं पाहायला मिळत आहेत. कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडा तुम्हाला एक ना एक लग्नाचा व्हिडीओ तरी नक्कीच दिसेल. ज्यामध्ये वधू-वरांच्या मेक अप किंवा ड्रेसपासून ते रात्रीचे सुंदर दृष्य आणि डान्सपर्यंत सर्व काही आपण पाहातो. आजकाल तर वधू-वरांचा लग्न मंडपात एन्ट्री करतानाचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, ज्याला लोकांकडून खूप पसंत केले जात आहे.

पूर्वीच्या काळी, नववधू लाजायच्या किंवा आपल्या लग्नात रडायच्या, परंतु काळाबरोबर आता सगळं काही बदललं आहे. आजच्या नववधू त्यांच्या लग्नातील प्रत्येक क्षणाचा आनंद लूटतात. लग्नाच्या शॉपिंगपासून ते हनिमूनची योजना आखण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्या आपले मत मांडतात. त्यामुळे सध्याच्या लग्नातली परिस्थिती थोडी वेगळी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका लग्नातल्या  वधूच्या एन्ट्रीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. जो सध्या ट्रेंडिंग तर आहे, परंतु त्यात एक अशी वेगळी गोष्ट आहे जी सगळ्यांचे लक्ष त्याकडे खेचत आहे.

ही खास गोष्ट म्हणजे वधूचा डान्स. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? ते तर सगळेच करतात. परंतु तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यामधील खास गोष्टीची जाणीव तुम्हाला होईल. कारण यामध्ये ही नववधू लग्नाची एन्ट्री चक्क एका मराठमोळ्या लेझीमवर करत आहे.

जिथे आज काल तरुण-तरुणीचा कल वेस्टन गाणी आणि कल्चरकडे आहे. अशावेळी या तरुणीने मराठमोळ्या लेझीमवर डान्स केला आहे आणि आपल्या भारतातील विशेषता महाराष्ट्रातील संस्कृतीला जपले आहे.

10 लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

आतापर्यंत 10 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यामध्ये वधूची एन्ट्री ही तिच्या टीमसोबत होते जिथे वधू आणि तिच्या घरची मित्रमंडळी तिच्या सोबत लेझीम वर ताल धरत आहेत. या वधूचा डान्स खरोखरचं  पाहाण्यासारखा आहे. त्यामुळेच इंस्टाग्रामच्या रील्सवर शेअर केलेल्या या व्हिडीओला लोकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे आणि यावर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Read More