Sonam and Raja Raghuvanshi Wedding Video: मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी यांची त्याच्यी पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनदरम्यान सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 21 मे रोजी मेघालयामध्ये हनिमूनसाठी दाखल झालेलं हे जोडपं 22 मे रोजी बेपत्ता झालं. त्यानंतर 2 मे रोजी राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतरही सोनमचंही काही बरं वाईट झालं की काय अशी शंका उपस्थित केली जात असतानाच 9 जूनच्या पहाटे सोनम उत्तर प्रदेशमधील एका ढाब्यावर सापडली. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. सोनमनेच तिला प्रियकर राज आणि तीन कंत्राटी मारेकरांच्या मदतीने पतीला संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली असून 22 मे ते 9 जूनदरम्यान नेमकं काय काय घडलं याचा माग सध्या पोलीस सोनमची चौकशी करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असतानाच आता सोनम आणि राजाच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राजा अगदी हसत हसत होणाऱ्या पत्नीच्या भांगेत सिंदूर भरताना दिसत आहे. मात्र सोनमच्या चेहऱ्यावरील माशीही हलत नाहीये. सोनम शून्यात नजर लावून लग्नात नेसतात तशी लाल रंगाची साडी परिधान करुन राजासमोर बसल्याचं दिसत आहे. गुरुजी सांगत असलेल्या गोष्टी राजा नीट ऐकून लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसतोय. मात्र सोनमला याच्याशी काहीच देणं घेणं नसल्याप्रमाणे ती नुसती बसून असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी या दोघांच्या लग्नातील या व्हिडीओमध्ये सोनमच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे दिसत असल्यांच सांगितलं जात आहे. सोनमच्या चेहऱ्यावरुनच ती लग्नामुळे खुश नसल्याचं स्पष्ट होत आहे असा दावा सोशल नेटवर्किंगवर केला जात आहे. "सोनमने लग्नाला नाही सांगितलं असतं तर आज राजा जिवंत असता. तिच्यात सुपारी देण्याची हिंमत होती मात्र प्रियकराबरोबर पळून जाण्याची हिंमत तिने दाखवली नाही," असं म्हणत सोनमला अनेकांनी मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्ती असं म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
Just take a look at this wedding video of Sonam and Raja Raghuvanshi and you will agree that Sonam was clearly not happy with this marriage.
— Incognito (@Incognito_qfs) June 9, 2025
Raja Raghuvanshi would have been alive if Sonam had said No to the marriage. She had the courage to hire contract killers but didn't had… pic.twitter.com/NbHlQQWzXK
तसेच, "यासाठी सोनमच्या पालकांनाही दोष दिला पाहिजे. त्यांना सोनमला प्रियकर आहे याची कल्पना असणारच. सर्व काही ठाऊक असूनही त्यांनी राजा रघुवंशीला सत्य न सांगता त्याच्याशी मुलीचं लग्न लावून दिलं," असं म्हणत सोशल मीडियावरुन सोनमच्या आई-वडिलांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.