Marathi News> भारत
Advertisement

Viral: पहिल्यांदाच कामावर गेलेल्या तरुणीचा संताप! म्हणाली, "HR ला एक झापड मारू का?" कारण...

What If I Slap My HR: आजची पिढी फास्ट निर्णय घेण्यावर भर देते आणि त्यांना त्यांच्या भविष्याची कोणतीही चिंता नसते. यासंबंधीची एक घटना चर्चेत आली आहे.     

Viral: पहिल्यांदाच कामावर गेलेल्या तरुणीचा संताप! म्हणाली,

Gen Z Employee salary news: एक कर्मचारी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करतो जेणेकरून त्याला महिन्याच्या शेवटी त्याचा मासिक पगार मिळेल. जेणेकरून तो पुढील संपूर्ण महिन्याचा खर्च आरामात भागवू शकेल. हव्या त्या गोष्टी करू शकेल. आता अशा परिस्थितीत जर एखाद्याचा पगार कापला गेला किंवा उशीरा आला तर राग येणं साहजिक आहे. यातच आजची पिढी निर्णय घेण्यात जरा घाई करते आणि त्यांना भविष्यात काय होईल याची फारशी चिंता नसते. असाच एक भन्नाट किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, जिथे एका नवख्या मुलीने पगार वेळेवर न मिळाल्यामुळे HR ला झापड मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चला नक्की काय झालं ते जाणून घेऊयात. 

नक्की काय झालं? 

एका 19 वर्षीय मुलीने रेडिटवर स्वतःचा अनुभव शेअर करत सांगितलं की ती सध्या तिच्या पहिल्याच नोकरीत आहे. पण सुरुवातीपासूनच पगार मिळण्याच्या वेळापत्रकामुळे ती इतकी हैराण झाली आहे की आता तिला वाटतंय की HR ला मारावं. होय, तिच्या म्हणण्यानुसार, पगार प्रत्येक वेळी उशिरा मिळतो.  अनेकदा तर दुसरा महिना संपायला येतो तेव्हा हातात येतो. तिने HR कडे अनेकदा तक्रार केली, पण काहीही फरक पडला नाही.

हे ही वाचा: 140000000000 रुपये खर्च करून टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट खरेदी करत आहे मानवी विष्ठा, कारण....

 

HR दिवसभर काहीच करत नाही.. 

ती पुढे म्हणते, "HR दिवसभर ऑफिसमध्ये काही काम करत नाही आणि त्यामुळे आमचा पगार वेळेवर अडतो. त्यामुळे आता मनात येतं की डायरेक्ट त्यांना झापड द्यावी. पण मग वाटतं, हे केल्यावर काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार?"

हे ही वाचा: महाराष्ट्रातलं एक अनोखं हिल स्टेशन, सौंदर्य इतकं की इटलीची आठवण येईल! फोटोग्राफी प्रेमींसाठी आहे स्वर्ग

fallbacks

काय म्हणाले नेटिझन्स?

ही पोस्ट चंगळीच व्हायरल झाली असून, लोकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, "कृपया हे करू नकोस, तुझं करिअर सुरू झालंय, यात काही गोंधळ झाला तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं." दुसऱ्याने गंमतीने लिहिलं, "HR ला झापड मारण्याऐवजी तिची रांगोळी बिघडव!" तिसऱ्याने सल्ला दिला की,  "जर पगार वेळेवर मिळत नसेल, तर थेट सीनियर मॅनेजमेंटला मेल करून तक्रार नोंदव."

हे ही वाचा: 'टी'ब्रेकमध्ये क्रिकेटर्स खरंच चहा पितात? स्टार क्रिकेटरने केला खुलासा

 

या व्हायरल पोस्टने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कोणतीही नोकरी असो, पगार वेळेवर न मिळाला तर काम करणाऱ्याचा मूड आणि मानसिकता बिघडतेच. पण उत्तर म्हणून कोणतीही अति प्रतिक्रिया देणं हा पर्याय नाही. योग्य पद्धतीने तक्रार नोंदवणं, हाच मार्ग आहे.

Read More