Marathi News> भारत
Advertisement

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय?  पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?   

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियावर कधी कुठल्या ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. मोये मोये या गाण्याने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब अगदी सोशल मीडियाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म ओपन करा तुम्हाला या गाण्यावर असंख्य रील्स मिळतील. या क्रेझमुळे नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या गाण्याला युट्यूबवर 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालंय. (What if Moye Moye is trending all over the world Understand the meaning first Moye Moye Trend )

हे गाणं इतकं ट्रेंड झालं की यावर रिल किंवा मीम दिसला नाही असं नक्कीच होणार नाही. पण तुम्हाला या गाण्याचा अर्थ तरी माहिती आहे का? खरं तर या गाण्यातील शब्द हा मोये मोरे असा आहे. मोरे या शब्दाचा अर्थ सर्बियन भाषेत 'दुःस्वप्न किंवा एखादा वाईट अनुभव'. 

तर या गाण्याचा नेमका अर्थ काय?

गाण्याचा आशय म्हणजे अपूर्ण राहिलेली स्वप्नं, अपूर्ण इच्छा-आकांक्षा यांच्यासमोर हार न मानता; या सर्व वाईट अनुभवांमध्ये खचून न जाता सकारात्मकतेने आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करत राहणं असं या गाण्यातून सांगण्यात आले आहे.

तर सतत येणाऱ्या वाईट अनुभव, नैराश्य, एकटेपणा यासर्वांवर मात करून कुणीतरी आपले प्रेमाने सांत्वन करेल, आपल्याला समजून घेण्याचा प्रयन्त करील अशी आशा या गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे.

कुठून आलं हे गाणं?

दोन मिनिट 57 सेकंदाचं हे गाणं खूप कमी वेळात ट्रेडिंगमध्ये आलंय. डेजनम असं या गाण्याचं शीर्षक असून हे गाणं सर्बियाई रॅपर स्लोबोदान वेक्कोविक कोबीनं लिहिलंय. मग तेया डोरा हे कोणाचं नाव आहे.

 

तेया डोराचं खरं नाव टेओडोरा पावलोवस्का असून तिला सर्बियाईमध्ये तेया डोरा नावाने ओखळलं जातं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TEYA DORA (@iamteyadora)

तेया ही लोकप्रिय गायिका आणि गीतकार आहे. 'दा ना मेनी जे' हे तिचं पहिलं गाणं सुपरहिट झालं होतं. दा ना मेनी जे, ओलुजा, यूलिस, यू अवैधी, वोजी मी, अटामाला अशी अनेक गाणी आहे. 

TAGS

Lifestyle newsLatest Lifestyle NewsLifestyle Live News OnlineLifestyle Daily News HeadlinesLifestyle Live Updatestrending newstrending todaytrending topicstrending videostrending News Todaylatest trendsTop trendstrending nowtrending topics todaytop trending newsLatest Trending Newsworld trending newswhat's trending todaytrending news worldwidetrending storiestrending now newscurrent trending newsmoye moyeduznuminstagraamfacebookyoutubesocial mediatrending songViral Songट्रेंडिंग विषयव्हायरल व्हिडिओट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग व्हिडिओट्रेंडिंग न्यूजट्रेंडिंग न्यूज मराठीमराठी ट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग न्यूजआजच्या ट्रेंडिंग बातम्यालाइफस्टाइल बातम्यालाइफस्टाइल ताज्या मराठी बातम्यालेटेस्ट लाइफस्टाइल न्यूजलाइफस्टाइल लाईव्ह अपडेटलाइफस्टाइल न्यूजजीवनशैली टिप्समोये मोयेडजनमट्रेंडट्रेंडिंग गाणीव्हायरल गाणीइन्स्टाग्रामफेसबुकयुट्युबसोशल मिडिया
Read More