Marathi News> भारत
Advertisement

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या Air Indiaच्या विमानाची किंमत किती?

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर विमान अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधला. 

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या Air Indiaच्या विमानाची किंमत किती?

Air India Plane Price: गुरुवारी संध्याकाळी गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash). हे विमान मेघानी परिसरात पडले. विमान पडताच मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसत होते. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत. मात्र, ते कोणत्या प्रकारचे विमान होते, त्यात किती प्रवासी होते आणि पायलटचे काय झाले याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एक प्रवासी विमान कोसळले. विमानात किती प्रवासी होते आणि ते कुठून जात होते याची माहिती हळुहळू समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. हे विमान अहमदाबादजवळील दुसऱ्या एका लहान विमानतळावर कोसळले. दरम्यान कोसळलेल्या विमानाची किंमत किती होती? जाणून घेऊया. 

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर विमान अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधला. टेकऑफनंतर विमान असंतुलित झाले आणि झाडावर आदळले. रिकाम्या जागेत पडल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले, अशी माहिती दिली जात आहे. विमानात अनेक व्हीव्हीआयपी प्रवासीही होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे म्हटले जाते की विमान टेकऑफ दरम्यान कोसळले.

गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. हे विमान लंडनला जात होते. या विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे एअर इंडियाचे एआय 171 फ्लाइट होते. हे विमान अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1.38 वाजता लंडनसाठी उड्डाण करत होते. अपघातग्रस्त झालेले विमान बोईंग कंपनीचे (787-8 ड्रीमलायनर) होते. हे बोईंग विमान जगभरातील अनेक एअरलाइन्सद्वारे चालवले जाते. या विमानाची किंमत सुमारे 248 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.

Read More