What is Non Veg Milk: शेती आणि दुग्धव्यवसाय ही अशी उदयोन्मुख क्षेत्र आहेत जिथे दोन्ही देश भारत-अमेरिका व्यापार करारावर 'मध्यम मार्ग' शोधत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्याव्यतिरिक्त, मांसाहारी दूध भारतासाठी एक सांस्कृतिक मुद्दा आहे. अमेरिका भारतावर डेअरी मार्केट उघडण्यासाठी दबाव आणत आहे. तथापि, आयात केलेले दूध मांसाहारी दूध नाही याची खात्री करण्यासाठी कठोर पडताळणीसाठी आग्रह धरत आहे.
मांस किंवा रक्तापासून बनवलेल्या पदार्थ खाण्यास दिलेल्या गाई किंवा इतर जनावरांकडून काढण्यात आलले्या दुधाला मांसाहारी दूध म्हणतात. धार्मिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेमुळे भारत मांसाहारी दूध आपल्या ग्राहकांना देऊ इच्छित नाही. भारताने ही ग्राहकासांठी लक्ष्मण रेषा असल्याचं म्हटलं आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराचे उद्दिष्ट 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे होते. तथापि, आता ते एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भारताने कृषी, डेअरी उत्पादनांचं कठोरपणे प्रमाणीकरण केलं जावं अशी मागणी केली आहे. जेणेकरुन मांस किंवा रक्तापासून तयारित पदार्थ खाऊ न घातलेल्या जनावरांपासून तयार केलेली डेअरी उत्पादनं आयात होऊ नयेत.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूटचे (GTRI) अजय श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, "तुम्ही कल्पना करा की, तुम्ही अशा एखाद्या गायीच्या दुधापासून बनवलेले बटर खात आहात, जिला दुसऱ्या गायीचे मांस आणि रक्त दिले गेले आहे. भारत कदाचित हे कधीही होऊ देणार नाही." भारतात, दुग्धजन्य पदार्थ केवळ वापरासाठीच नाहीत तर धार्मिक विधींचा एक आवश्यक भाग देखील आहेत.
अमेरिकेने दुग्धव्यवसाय आणि शेतीसंदर्भातील भारताची भूमिका अनावश्यक अडथळा निर्माण करणारी असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे सर्वात मोठा दूध उत्पादक देश असणारा भारत आपल्या लाखो लहान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे रक्षण करण्यास बांधील आहे. दुग्ध उद्योग भारतातील 1.4 अब्जाहून अधिक लोकांना अन्न पुरवतो आणि 8 कोटींहून अधिक लोकांना, प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांना रोजगार देतो.
इंडियन एक्सप्रेस की रिपोर्ट के अनुसार वर्तमान में भारत डेयरी उत्पादों पर काफी ज्यादा टैरिफ लगाया जाता है. भारत पनीर पर 30%, मक्खन पर 40% और दूध पाउडर पर 60% टैरिफ लगाता है. इससे न्यूजीलैंड और ऑस्ट्रेलिया जैसे कम लागत वाले देशों से भी डेयरी प्रोडक्ट को आयात करना मुश्किल हो जाता है. इसके अलावा भारत का पशुपालन एवं डेयरी विभाग खाद्य आयातों के लिए सर्टिफिकेट अनिवार्य करता है जिससे यह सुनिश्चित होता है कि डेयरी उत्पाद सहित सभी उत्पाद ऐसे पशुओं से हासिल किए गए हों जिन्हें मांसाहारी चारा नहीं खिलाया जाता.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सध्या भारत दुग्धजन्य पदार्थांवर खूप जास्त कर आकारतो. भारत पनीरवर 30 टक्के, बटरवर 40 टक्के आणि दुधाच्या पावडरवर 60 टक्के कर आकारतो. यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या कमी किमतीच्या देशांमधूनही दुग्धजन्य पदार्थ आयात करणं कठीण होते. याशिवाय, भारताचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग अन्न आयातीसाठी प्रमाणपत्रे अनिवार्य करतो, ज्यामुळे दुग्धजन्य पदार्थांसह सर्व उत्पादने मांसाहारी आहार न देणाऱ्या प्राण्यांपासून मिळवली जातात याची खात्री होते.