Marathi News> भारत
Advertisement

'हा' घ्या EMI कमी करण्यासाठीचा रामबाण उपाय; पैसेही वाचतील आणि मनस्तापही कमी होईल

Loan Refinancing : वैद्यकिय किंवा आणखी कोणत्या आपात्कालीन समयी पैशांची निकड भासल्यास अनेक मंडळी कर्जाचा पर्याय निवडतात.   

 'हा' घ्या EMI कमी करण्यासाठीचा रामबाण उपाय; पैसेही वाचतील आणि मनस्तापही कमी होईल

Loan Refinancing : खासगी किंवा आणखी कोणत्याही  कारणासाठी आर्थिक चणचण भासल्यास पैशांची निकड भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणं हाच अनेकांपुढचा अंतिम पर्याय असतो. आर्थिक गरज भागण्यावर लक्ष केंद्रीत असताना अनेकांचच लक्ष व्याजदराकडे जात नाही. मात्र, ही गरज भागल्यानंतर जेव्हा कर्ज फेडण्याची वेळ येते तेव्हा मात्र कर्जाचा हा भार वाढत्या व्याजदरामुळं अधिकच वाटू लागतो. अशा वेळी एका उपायानं कर्जाचा हा भार काही अंशी कमी करता येतो. यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे, पर्सनल लोन रीफाइनान्सिंग (Personal Loan Refinancing).

पर्सनल लोन रीफाइनान्सिंग म्हणजे जुनं कर्ज नव्या कर्जामध्ये रुपांतरित करणं. या तरतुदीमध्ये व्याजदर आणि कर्जाच्या कालावधीमध्ये बदल करता येतो. उदाहरणार्थ, 14 टक्के व्याजावर 5 वर्षांचं कर्ज घेतलं असता दुसरी कोणतीह बँक 11 टक्के व्याजानं कर्ज देत असल्यास तुम्ही नवं कर्ज घेऊन जुनं कर्ज फेडू शकता. असं केल्यास तुमचा कर्जाचा हफ्ता कमी होईल. 

लोन रिफायनान्सिंगची कारणं काय?

आधीचं कर्ज महाग पडत असल्यास अनेकदा ग्राहक हा पर्याय निवडतात. अनेकदा आपण कर्ज घेतलेल्या बँकांहून कमी व्याजावर इतक बँका अधिक चांगल्या व्याजदरावर कर्ज देत असतील तर अशा वेळी जुनं कर्ज अधिक महाग वाटू लागतं. अशा स्थितीमध्ये आधीचं कर्ज घेऊन 6 ते 7 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यास त्या ग्राहकांना सहजपणे लोन रिफायनान्सिंग करता येतो. असं केल्यास होणारे इतर फायदे खालीलप्रमाणे... 

व्याजदरात घट- 2024 मध्ये तुम्ही जर अधिक व्याजदरावर कर्ज घेतलं असेल तर, 2025 मध्ये आरबीआयकडून व्याजदर घटवण्यात आल्यानं तुम्हीही लोन रिफायनान्सिंग करु शकता. 

अधिक किंवा कमी काळासाठीचं कर्ज - कर्जाचा हफ्ता अधिक असल्यास अधिक कालावधीचं नवं कर्ज घेत ईएमआय कमी करता येऊ शतो. तुमचं आर्थिक उत्पन्न वाढल्यास कर्जाचा कालावधी कमी करून तुम्ही ईएमआय वाढवून कर्ज लवकरात लवकर फेडू शकता. 

लोन रिफायनान्सिंग करावं की नाही? 

नवं कर्ज घेऊन तुम्हाला या कर्जातून चांगली आणि समाधानकारक बचत करता येत असेल, तर लोन रिफायनान्सिंग हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र जर प्रोसेसिंग फी आणि फोरक्लोजर चार्ज मिळून बचत कमी किंवा अगदी बचत होतच नेल तर हा निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. 

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी24 तास याची खातरजमा करत नाही. आर्थिक निर्णयांसंदर्भात जाणकारांचं मार्गदर्शन घ्या. )

Read More