Marathi News> भारत
Advertisement

पृथ्वीवरील सर्वात विषारी साप! विष इतके पॉवरफुल असते की एका दंशात 100 लोकांचा जीव जाईल

पृथ्वीवरील सर्वात विषारी साप कोणते? यात भारतातील सापांच्या अनेक घातक प्रजातींचाही समावेश आहे.  

पृथ्वीवरील सर्वात विषारी साप!  विष इतके पॉवरफुल असते की एका दंशात 100 लोकांचा जीव जाईल

Inland Taipan : नुसता साप पाहिला तरी अनेकांची बोबडी वळते. जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. काही साप विषारी तर काही साप विनविषारी असतात. पृथ्वीवर एक भयानक विषारी साप आहे. या सापाचे विष इतके  पॉवरफुल असते की  एका दंशात 100 लोकांचा जीव जाईल.जगातील सर्वात विषारी साप कोणता? जाणुन घेऊया. 

इनलँड टायपन (Oxyuranus microlepidotus) असे या सापाचे नाव आहे. हा पृथ्वीवरील सर्वात विषारी साप मानला जातो. याचे  विष इतके शक्तिशाली असते की एका दंशाने 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो. इनलँड टायपनचे विष 110 मिलीग्राम पर्यंत असू शकते.  110 मिलीग्राम विषात 2,50,000 उंदीर मारण्याची क्षमता आहे. त्यात हायलुरोनिडेस नावाचे एन्झाइम असते, जे विष शरीरात वेगाने पसरवते.

क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या मैदानी भागात हा साप आढळतो. हा साप बहुतांशी मातीच्या भेगांमध्ये लपलेले असते. इनलँड टायपन हा खुपच दुर्मिळ साप आहे.  शत्रुची किंवा धोक्याची चाहुल लागताच हा साप शरीराला एस आकारात गुंडाळतो आणि हल्ला करतो. 

भारतीय क्रेट, ज्याला कॉमन क्रेट असेही म्हणतात. हा भारतीय साप देखील खूपच विषारी आहे. जगात क्रेट सापांच्या एकूण 12 प्रजाती आणि 5 उप-प्रजाती आहेत. याच्या दंशानंतर फक्त 45 मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. रसेल वाइपर हा भारतातील सर्वात सामान्य आणि व्यापक विषारी सापांपैकी एक आहे. सॉ-स्केल्ड वाइपर हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. त्याला "लिटल इंडियन वाइपर" असेही म्हणतात.भारतीय नाग हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि भयंकर सापांपैकी एक आहे. भारतीय कोब्रा विष एक न्यूरोटॉक्सिन आहे, याचा अर्थ ते मज्जासंस्थेवर हल्ला करते. 
 

Read More