Marathi News> भारत
Advertisement

नव्या पण फाटलेल्या नोटांचं करायचं तरी काय? जाणून घ्या...

अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केलीय

नव्या पण फाटलेल्या नोटांचं करायचं तरी काय? जाणून घ्या...

मुंबई : नव्याने चलनात आलेल्या नोटा फाटलेल्या असल्यास काय करायचं अशा चिंतेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा फाटलेल्या असल्यास त्या बदलून मिळणार आहेत. खराब आणि फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.

नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर काही दिवसांत दोनशे रुपयांची नोटही रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. मात्र या नोटा खराब किंवा फाटल्या तर तर त्या बदलून मिळत नव्हत्या. कोणताच कायदा नसल्याने बँक नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या.

मात्र, आता अर्थं मंत्रालयाने अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केलीय. 

Read More