Marathi News> भारत
Advertisement

Reels बनवणं 3 मित्रांच्या जीवावर बेतलं... नक्की असं काय घडलं जाणून घ्या

महिंद्रा सिटीजवळील रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

Reels बनवणं 3 मित्रांच्या जीवावर बेतलं...  नक्की असं काय घडलं जाणून घ्या

मुंबई : आजकाल इंटरनेटवर व्हायरल होण्याचे भूत प्रत्येकाला लागलेले असते. ज्यामुळे जो-तो तुम्हाला इन्स्टाग्राम रील्स बनवताना दिसतो. लाईक्स आणि शेअर्स मिळवण्याची क्रेज लोकांना अशी काही लागली आहे, की बऱ्याचदा लोकं असे व्हिडीओ बनवताना आपल्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक घटना तामिळनाडूतून समोर आली आहे, जिथे इंस्टाग्राम रील्स बनवण्याच्या नादात तीन मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या या तीन मित्र रिल्स बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेले. ते चेंगलपट्टूजवळील विल्लुपुरम येथे पोहोचले होते. गुरुवारी सायंकाळी एग्मोर येथून एक पॅसेंजर ट्रेन या रेल्वे ट्रॅकवरून जात होती. त्यावेळेस ट्रेन जात असताना आपण चांगला व्हिडीओ बनवू असा या तीन मित्रांनी विचार केला. परंतु तो फसला.

ट्रेन समोरुन येत असताना हे तिन मित्र व्हिडीओ बनवू लागले. तेव्हा त्यांना ट्रेनने धडत दिली. तेवाह व्हिडीओ बनवताना तीन मित्रांनी एकत्र जीव गमावला.

महिंद्रा सिटीजवळील रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. तिन्ही मित्रांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे. मृतांमध्ये एक तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तर दुसरा रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता. तिघेही मित्र एकाच परिसरातील रहिवासी आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी या तिन्ही मित्रांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चेंगलपेठच्या शासकीय रुग्णालयात पाठवले.

एका तपास अधिकाऱ्याने या घटनेबाबत सांगितले की, तिघांचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासले जात आहेत. यानंतर तिघांनीही यापूर्वीही असे व्हिडीओ अपलोड केले असल्याचे उघड झाले आहेत.

Read More