Harjeet Singh: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेमध्ये अचानक गोळीबार झाल्याने गोंधळ उडाला. 9 जुलैच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये हल्लेखोर गोळ्या कशा चालवत आहेत हे पाहता येते. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लाडीने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. ज्याच्यावर एनआयएने तब्बल 10 लाखांचं बक्षिस जाहीर केलंय. कोण आहे हा हरजीत सिंग लाडी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हरजीत सिंग लाडी हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय. हरजीत हा बंदी घातलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. भारतीय सुरक्षा संस्था बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत आहेत पण त्याचे नेमके ठिकाण सापडलेले नाही. तो जर्मनीमध्ये असल्याचे अनेक वेळा वृत्त होते.
विश्व हिंदू परिषदेचे नेते विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या हत्येप्रकरणी हरजीत सिंग लाडीचे नाव प्रथम गुन्हेगारीच्या जगात पुढे आले. 13 एप्रिल 2024 रोजी पंजाबमधील रूपनगर येथे विकासची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एनआयएने या हत्येचा तपास केला तेव्हा पाकिस्तानस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वाधवा सिंग बब्बर आणि हरजीत सिंग उर्फ लड्डी यांची नावे समोर आली. लड्डी त्यावेळी जर्मनीमध्ये राहत होता.
बब्बर खालसा इंटरनॅशनल ही एक धोकादायक दहशतवादी संघटना आहे. 23 जून 1985 रोजी एअर इंडियाचे विमान अपहरण करून बॉम्बने उडवण्यात आले तेव्हा ते जगात चर्चेत होते. ही घटना आयर्लंडमध्ये घडली. या घटनेत 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या बब्बर खालसाने पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची आत्मघातकी हल्ल्यात हत्या केली होती. ही खलिस्तानी दहशतवादी संघटना भारतात प्रामुख्याने पाकिस्तान आणि कॅनडामध्ये बसून दहशत पसरवतेय.
World Famous comedian Kapil Sharma's newly inaugurated restaurant KAP'S CAFE shot at in Surrey, BC, Canada last night.
— Ritesh Lakhi CA (@RiteshLakhiCA) July 10, 2025
Harjit Singh Laddi, a BKI operative, NIA's (INDIA ) most wanted terrorist has claimed this shoot out citing some remarks by Kapil@SurreyPolice pic.twitter.com/p51zlxXbOf
कपिल शर्मानेकाही दिवसांपूर्वीच हे कॅफे उघडले होते. त्याचे नाव केएपी'एस कॅफे होते. कपिल आणि त्यांची पत्नी गिन्नी चतरथ यांनी या कॅफेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणाऱ्या कपिलच्या कॅफेवर हल्ला झाला तेव्हा लोकांना धक्का बसला. हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दरोडेखोर कारमधून बाहेर पडल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहेत.
कॅनडास्थित कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर विनोदी कलाकार कपिल शर्मा चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने या कॅफेचे उद्घाटन केले आणि त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याबद्दलचा एक खास प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने त्याच्या कॅफेबद्दल आनंद व्यक्त केला आणि लोकांमध्ये दिसणाऱ्या क्रेझची झलक दाखवली.
कपिल शर्माच्या कॅफेची लोकप्रियता आणि प्रमोशन कुठेतरी त्याच्यासाठी हानिकारक ठरल्याचं म्हटलं जातंय. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि एनआयए आणि बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) चा कार्यकर्ता हरजीत सिंग लाडीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कपिल शर्माच्या भूतकाळातील काही विधाने मला आवडली नाहीत आणि त्यामुळे मी गोळीबाराचे आदेश दिल्याचे त्याने म्हटलंय.
असे असले तरी कपिल शर्मा आणि त्याच्या कुटुंबाकडून आतापर्यंत या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उद्घाटनाच्या दिवशीच कॅनडामधील कपिलच्या कॅप्स कॅफेमध्ये मोठ्या संख्येने लोक दिसत होते.
कपिल शर्मा हा पहिला भारतीय सेलिब्रिटी नाही ज्याने परदेशात कॅफे किंवा रेस्टॉरंट उघडले आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी असे केले आहे. जर आपण कॅनडामधील कपिलच्या कॅफेचे स्थान पाहिले तर ते ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे आहे. जे कपिलने त्याची पत्नी गिन्नीसोबत उघडले आहे.