Marathi News> भारत
Advertisement

174 निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा पाकिस्तानी...; Tahawwur Rana राणा आहे तरी कोण?

Tahawwur Rana Extradition News in Marathi : भारतीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेच्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार असून कोणत्याही क्षणी या राणाला भारतात आणलं जाणार आहे....   

174 निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा पाकिस्तानी...; Tahawwur Rana राणा आहे तरी कोण?

Tahawwur Rana Extradition News in Marathi : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भारतात त्याला थेट मुंबईत आणणार की दिल्लीतील कारागृहात ठेवणार याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राणाला तताडीनं एनआयएकडे सोपवलं जाणार आहे. ज्यानंतर पुढील काही आठवडे एनआयए कोठडीत त्याची चौकशी केली जाईल. 

कोण आहे निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा तहव्वूर राणा? 

बीबीसीच्या वृत्तानुसार तहव्वूर हुसैन राणा याचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला. पुढे वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्करातील वैद्यकीय विभागात डॉक्टर पजावर सेवेत रुजू झाला. 1997 मध्ये राणा त्याच्या पत्नीसह कॅनडाला गेला आणि 2001 मध्ये त्या दोघांनी कॅनडाचं नागरिकत्वं स्वीकारलं. 

पुढे शिकागोमध्ये स्थायिक होत त्यानं तिथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती. इथंच त्याची भेट डेविड कोलमॅन हेडली याच्याशी झाली. याच हेडलीनं मुंबईतील हल्ल्यात षडयंत्र रचल्याचंही म्हटलं गेलं. 

मुंबईवर वक्रदृष्टी... 

26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर 10 दहशतवाद्यांनी हल्ला करत 174 निष्पापांचा बळी घेतला होता. ज्यानंतर भारतानं सातत्यानं या हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानात रचला गेल्याचा गंभीर आरोप करत त्या हल्ल्यात सक्रिय असणारे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचं म्हटलं गेलं. सदर प्रकरणात अजमल कसाब या दहशतवाद्याला 2012 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

तिथं भारतीय यंत्रणांच्या वतीनं डेविड हेडलीच्या चौकशीदरम्यान एक नाव सातत्यानं समोर आलं होतं आणि हे नाव होतं तहव्वूर हुसैन राणा. शिकागोमध्ये सुरू असणाऱ्या खटल्यादरम्यान राणाविरोधातील बरीच माहिती समोर आली. खटला त्या क्षणी फिरला जेव्हा हेडलीनं सरकारच्या बाजूनं साक्ष देत न्यायव्यवस्थेपुढं राणाविरोधातील पुरावे सादर केले, जिथं राणानंच हेडलीची मदत केल्याचं वास्तव समोर आलं होतं. 

हेडली 2006 ते 2008 दरम्यान अनेकदा मुंबईत आला आणि त्यानं मुंबईतील अनेक भागांची रेकी केल्याचं तपासातून समोर आलं. ज्यासाठी राणानं आपल्या एजन्सीच्याच माध्यमातून शहरात एक ऑफिस सुरू केलं. हेडलीला बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठीच ही कटकारस्थानं केली जात होती. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. याच प्रकरणी अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबत इतर 12 आरोपांमध्ये तहव्वूर राणाला शिक्षा सुनावत FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांनाही शिकागो विमानतळावर पकडलं होतं. या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली होती. 

Read More