Who is The Wife Of Shubhanshu Shukla : आज आपण सगळीकडे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं नाव ऐकत आहोत. त्यांच्या यशाच्या चर्चा आणि किस्से सगळीकडेच ऐकायला मिळत आहेत. शुभांशु शुक्ला आज Axiom-4 या खास मिशनसाठी तीन इतर अंतराळवीरांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन असलेले शुभांशु शुक्ला आता इतिहास रचण्याच्या मार्गावर आहेत. या मिशनचं प्रक्षेपण आज 25 जून रोजी झालं. याआधी बऱ्याच वेळा हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं. पण यावेळी सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि मिशन यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. शुभांशु यांनी या प्रक्षेपणाला जाण्या आधी सोशल मीडियावर पत्नीसाठी एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करता नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या पत्नीची चर्चा आहे. कारण शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल आपण अनेक वेळा वाचलं , त्यांनी कुठे शिक्षण घेतलं, ते अंतराळात कसे गेले, त्यांच्या ट्रेनिंगबद्दल पण त्यांच्या पत्नीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पण त्यांच्या पत्नीविषयी अशी काही माहिती समोर आली नव्हती. आज त्यांच्या पत्नीविषयी जाणून घेऊया.
शुभांशु हे लखनऊचे आहेत. तर त्यांचे वडील शंभू द्याल शुक्ला हे एक रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत. त्यांची आई आशा शुक्ला या गृहिणी आहेत. शुभांशु हे तीन भावा-बहिणींमध्ये सगळ्यात छोटे आहेत.
शुभांशु शुक्ला यांनी 7 वर्षांपूर्वी लखनऊमधअये कामना शुक्लाशी लग्न केलं. कामना या डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. शुभांशु आणि कामना यांचा एक 6 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव सिड आहे. त्या नेहमीच शुभांशु यांना पाठिंबा देत असतात.
हेही वाचा : ना शाहरुख, ना रजनीकांत 'या' भारतीय अभिनेत्याच्या आयुष्यावर कॅनडात सुरु झाला अभ्यासक्रम; पाहा सिलॅबस
शुभांशु आणि कामना यांचं लव्ह मॅरेज अर्थात प्रेमविवाहं आहे. शुभांशु आणि कामना हा लहाणपणापासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांची पहिली भेट ही इयत्ता तिसरीत असताना झाली. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कामना यांनी सांगितलं की शुभांशु लहाणपणापासून लाजाळू होते. तर आज ते लाखो लोकांची प्रेरणा ठरले आहेत. आज शुभांशु जिथे स्पेस मिशनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. तर दुसरीकडे त्यांची पत्नी ही हजारो रुग्णांची सेवा करत आहे.