Air India Plane Pilot Name : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI171 या लंडनला जाणाऱ्या फ्लाईटचा मोठा अपघात झाला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अपघात होताच तातडीनं NDRF च्या चार टीम्स घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.
या फ्लाईटचे मुख्य वैमानिक (कॅप्टन) सुमित सभरवाल होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते. दोघांचाही विमान उड्डाणाचा चांगला अनुभव आहे. कॅप्टन सुमित यांचा 8200 तासांची फ्लाईंग एक्सपीरियन्स आहे, तर क्लाइव कुंदर यांनी 1100 तास उड्डाण केले आहे.
ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) च्या माहितीनुसार, विमानानं दुपारी 1 वाजून 30मिनिटांनी अहमदाबादच्या रनवे 23 वरून उड्डाण केलं. उड्डाण झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात विमान एअरपोर्टच्या बाहेर असलेल्या भागात खाली कोसळलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान एका झाडावर आदळलं आणि नंतर आग लागली आणि धूर येऊ लागला.
रिपोर्ट्सनुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचं जमिनीवरून उंची ही खूपच कमी होती. त्यामुळे पायलटला काही प्रतिक्रिया देण्याची, मदत मागण्याची संधीच मिळाली नाही. जर विमान थोडं जास्त उंच गेलं असतं, तर कदाचित पायलट काहीतरी पाऊल उचलू शकले असते. पण दुर्दैवानं तसं झालं नाही.
दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून 52 ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते. अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानाच्या केबीन क्रु अपर्णा महाडीक या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत. एअर इंडियाच्या या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच अवघ्या 4 मिनिटांत हा अपघात झाला.
हेही वाचा : Ahemdabad Plane Crash नं बॉलिवूड सुन्न; पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दु:ख
या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी संवाद साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक एजन्सी मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.