Marathi News> भारत
Advertisement

84 टक्के लोकं का म्हणतायत वर्क फ्रॉम होम नको!

आता या वर्क फ्रॉम होमला लोकं पुरती वैतागली असल्याचं समोर आलं आहे.

84 टक्के लोकं का म्हणतायत वर्क फ्रॉम होम नको!

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या त्यांच्या अनेक सवयी बदलाव्या लागल्या आहेत. अशातच बहुतांश लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याने गेले दीड वर्ष लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. मात्र आता या वर्क फ्रॉम होमला लोकं पुरती वैतागली असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याचं झालेल्या एका सर्व्हेक्षणातून 84 टक्के लोकं घरातून काम करण्यास वैतागले असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे आता वर्क फ्रॉम होम बंद करून ऑफिस सुरु करावं असं मतं 84 टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. 

Deloitteने यासंदर्भात सर्व्हेक्षण केलं आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात 1000 लोकांचं ऑनलाईन सर्व्हेक्षण केलं गेलं. या सर्व्हेक्षणाचा अहवाल 'ग्लोबल स्टेट ऑफ कंज्यूमर ट्रॅकर'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 

या सर्व्हेक्षणात लोकांनी सांगितलं की, घरात बसून काम करण्यास अडचणी येत आहेत. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे, ते घरी बसून कंटाळले असून त्यांना ऑफिसची आठवण येत आहे. सहकाऱ्यांसोबत होणारी चर्चा, कामकाजाच्या बैठका, एकमेकांची मस्करी, टोणे-टोमणे या गोष्टींची खूप आठवण येत असल्याचं मत या सर्व्हेक्षणात अनेकांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान 60 टक्के लोकांनी काम करताना एकमेकांशी चर्चा करत काम करण्याची गरज असते असं म्हटलंय. त्याचप्रमाणे कामाविषयी चर्चा, ऑफिसच्या मिटींग या सर्वांची गरज आहे. इतकंच नव्हे तर व्हिडीयो कॉलवर मजा येत नसल्याचंही अनेकांनी म्हटलंय.

Read More