Marathi News> भारत
Advertisement

Explainer : नेपाळमधील भूकंपानंतर बद्रीनाथमध्ये हिमस्खलन; योगायोग नव्हे तर... निसर्ग देतोय विध्वंसाचे संकेत?

Earthquake News : भारतभूमी संकटात? 5 दिवसात 11 भूकंप; बद्रीनाथमधील हिमस्खलनानंतर विध्वंसाचे संकेत मिळताच चिंतेत भर   

Explainer : नेपाळमधील भूकंपानंतर बद्रीनाथमध्ये हिमस्खलन; योगायोग नव्हे तर... निसर्ग देतोय विध्वंसाचे संकेत?

Earthquake News : भारतीय उपखंडातील हिमालयीन क्षेत्रासह नजीकच्या देशांमध्ये सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी आता चिंता वाढवली आहे. मागील 28 दिवसांचा आढावा घेतल्यास साधारण 14 भूकंपांची नोंद करण्यात आली. 4 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रता असणाऱ्या या श्रेणीत हे भूकंप गणले गेले. भीतीदायक बाब म्हणजे भूकंपांची ही मालिका इतक्यावरच थांबणार नसून, दिवसागणित त्यात आणखी वाढ होणार आहे. 

भूगर्भशास्त्रज्ञांनी जानेवारी महिन्यातच यासंदर्भातील इशारा देत संशोधकांनाही सतर्क केलं होतं. हिमालयातील भूगर्भीय हालचालींमुळंच खरंच इतके भूकंप येत आहेत का? हाच प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. भूकंपांनी चिंता वाढवलेली असतानाच त्यात भर पडली ती म्हणजे बद्रीनाथ धाम येथील माणा गावात झालेल्या हिमस्खलनाची. 

सदर भागाचा आढावा घेण्यात आला तर, इथं हिमस्खलन किंवा भूस्खलनासारख्या घटना अगदी सामान्य आहेत. पण, हिमवृष्टी सुरी असताना हा बर्फाच्छादित डोंगरकडा इतक्या भयावह पद्धतीनं कोसळणं ही बाब मात्र काहीची अनपेक्षित ठरली कारण, या संकटाची दूरदूरपर्यंत चाहूलच नव्हती. 

बद्रीनाथमध्ये झालेली हिमस्खलनाची घटना सर्वसामान्य नसून या घटनेमुळं दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापैकी एक  म्हणजे इथं वादळसदृश्य हवामान स्थितीची कोणतीही चिन्हं नव्हती आणि दुसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण हिमालय क्षेत्रामध्ये जाणवणारे धरणीकंप. या शक्यता आणि सद्यस्थिती हा निव्वळ योगायोग नसून, हे एका मोठ्या संकटाचे संकेत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

घटनाक्रमाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी बद्रीनाथ धाम इथं हिमकडा कोसळला, तत्पूर्वी काही तास आधीच नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. परिणामी बद्रीनाथमधील या घटनेस हिमालयाच्या तळाशी होणाऱ्या हालचाली कारणीभूत आहेत ही बाब नाकारता येत नाही. या भागात भूकंपाची नोंद करण्यात आली नसली तरीही इथं भूगर्भात निर्माण होणारी कंपनी इतकी जास्त तीव्र असतात की त्यामुळं ग्लेशियर दुभंगून मोठमोठ्या दऱ्याही निर्माण होतात. हिमालयाची एकंदर रचना आणि सध्या घडणाऱ्या घटना पाहता भूगर्भातील या हालचाली येणाऱ्या एका मोठ्या संकटाचे संकेत देत तर नाहीत? हाच भीतीदायक प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

विध्वंसातूनच निर्माण झालाय हिमालय... 

आजच्या घडीला हिमालय हा उत्तुंग पर्वत जिथं स्थिरावला आहे तिथं 225 कोटी वर्षांपूर्वी टिथिस समुद्र असल्याचं सांगितलं जातं. पृथ्वीच्या उदरात सागरी आणि महाद्वीपीय थरांमध्ये सतत बदलणाऱ्या गतीमुळं या समुद्रानं भारतीय थर आशिया आणि युरोपच्या थरापासूव वेगळा केला होता. या प्रक्रियेत टिथिस सागराचं अस्तित्वं नष्ट झालं आणि भारतीय उपखंडाचा थर वेगानं पुढे सरकला. 

भारतीय आणि युरेशियन हे दोन थर जवळ आल्यानं टिथिस सागरावर दबाव वाढला आणि त्यातूनच जो थर वर उचलला देला त्यातून 3 भागांमध्ये हिमालय पर्वत तयार झाला. हिमालय पर्वत तीन थरांमध्ये विभागला जातो ज्यात अनुक्रमे ग्रेटर (एव्हरेस्टसारखी शिखरं), मिडल (मध्य हिमालय) आणि खालचा थर (लघु हिमालय) यांचा समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : बँक इतकी मेहेरबान? खात्यात 24,492 ऐवजी जमा झाला 7,08,51,14,55,00,00,000 रुपयांचा पगार आणि मग.... 

वरील तिन्ही भागांच्या खालून, भूगर्भातून एक फॉल्टलाईन या संपूर्ण क्षेत्रामध्ये वारंवरा येणाऱ्या भूकंपास कारणीभूत ठरते असं अभ्यासकांतं मत. साधारण 2900 किमी लांबीच्या या रेषेला 'मेन सेंट्रल थ्रस्ट (MCT)' असंही म्हटलं जातं. हा तोच केंद्रबिंदू आहे जिथं भूपृष्ठाच्या खाली असणाऱ्या थरांचं एकमेकांवर घर्षण होत त्यातून प्रचंड उर्जा निर्माण होत असते. 

घर्षण प्रक्रियेदरम्यान अनेकदा हे दर एकमेकांव आदळून काही कंपनं निर्माण होतात. सहसा कमी तीव्रतेच्या भूकंपांना प्रीकर्सर शॉक्स असं म्हटलं जातं. या कंपनांनंतर मोठा भूकंप येतोच असं नाही. पण, एखाद्या मोठ्या भूकंपानंतर मात्र कमीजास्त तीव्रतेची अनेक कंपनं सातत्यानं जाणवत राहतात. सध्या हिमालयाच्या भूर्भात अशा अनेक हालचाली सुरू असून, त्यामुळं हिमालयच्या उंचीसह त्याच्या क्षेत्रफळावरही या हालचालींचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. यातूनच ही कोणत्या मोठ्या संकटाची चाहूल तर नाही, हाच प्रश्न डोकं वर काढतो. 

Read More