Ganga River Flow: भारतात हिमालयातून (Himalayan Mountan ranges) उगम पावणारी गंगा नदी ही फक्त एक नदी, किंव एक जलप्रवाह नसून, ही नदी आस्थेचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं देशाचा सांस्कृतिक वारसा आहे. मानवाच्या जन्मापासून अगदी मृत्यूशय्येपर्यंत किंबहुना मृत्यूनंतरही हीच नदी त्याला साथ देताना दिसते. हिमालयातून प्रवाहित होणारी ही नदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन समुद्राशी एकरु होते आणि इथं या ठिकाणाला गंगासागर असं म्हटलं जातं.
गंगा नदीसंदर्भात अशी बरीच माहिती आजवर वाचण्यात आणि पाहण्यात आली असेल. पण, तरीही काही मुद्दे किंवा काही गोष्टी मात्र अद्यापही फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विरुद्ध दिशेला वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाची. जाणून आश्चर्य वाटेल, पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथं या गंगा नदीचा प्रवाह विरुद्ध दिशेनं वाहतो. पण असं नेमकं का? माहितीये?
वाचून विश्वास बसणार नाही, पण ज्या काशी विश्वनाथ धाम इथं जाऊन गंगाआरती केली जाते त्याच बनारस/ काशी/ वाराणासी इथं पवित्र गंगा नदीचा प्रवाह उलट दिशेनं वाहतो. आपल्या संपूर्ण प्रवाहमार्गात गंगा नदी पूर्वेकडे वाहते. मात्र, काशी विश्वनाथाच्या या नगरीमध्ये गंगा नदी दक्षिणदिशेला वाहते. प्रत्यक्ष गंगा नदीच्या प्रवाह दिशेपेक्षा ही दिशा अतिशय विरुद्ध असल्याचं सांगण्यात येतं.
काशीमध्ये गंगा नदी विरुद्ध दिशेनं प्रवाहित होणं अतिशय शुभ समजलं जातं. याच धारणेतून इथं गंगेच्या प्रवाहात स्नान करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी पाहायला मिळते. काहींची अशीही धारणा आहे की, असं केल्यानं भगवान शंकराची कृपा राहते आणि आर्थिक सुबत्ता येते.
काशी धाम येथे येणाऱ्या प्रत्येकासाठीच गंगा नदीचं महत्त्वं हे व्यक्तिनुरूप बदलत असतं मात्र याच नदीविषयीची ही माहिती मात्र साऱ्यांच्याच भुवया उंचावते.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)