Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: लग्नानंतर दुसऱ्याच क्षणी नवरीबाईनं नवऱ्याला बदडलं आणि....

नाकावरच्या रागाला औषध काय....? 

Viral Video: लग्नानंतर दुसऱ्याच क्षणी नवरीबाईनं नवऱ्याला बदडलं आणि....

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडिओ चांगली शिकवण देणारे, प्रेरणा देणारे असतात. पण सध्या इंटरनेटवर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला हासू आवरणार नाही. व्हिडिओ नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा आहे. नवीन लग्न झाल्यानंतर नवरी लाजते. नवीन आयुष्याची सुरूवात होणार म्हणून तिच्या मनात थोड दडपण असतं. 

पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरी चक्क नवऱ्याला मारताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल. व्हायरल होत असलेला नव्या जोडप्याचा व्हिडिओ काही सेकंदाचा आहे. लग्नच्या सर्व विधी झाल्यानंतर नवरी सासरी जाण्यासाठी कारमध्ये बसते. तिच्यासोबत नवरा देखील बसतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

सुरूवातीला सर्व काही अगदी व्यवस्थित असल्याचं दिसत आहे. पण काही क्षणात असं काय होतं ज्यामुळे नव्या नवरीला एवढा राग येतो की ती चक्क नवऱ्याला मारू लागते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More