Love Affair Crime News: बिहारच्या समस्तीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रघुकंठ गावातील सोनू कुमार नावा्च्या तरुणाचा मृतदेह घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी संशयित म्हणून सोनूची पत्नी स्मिता झा हिला अटक करण्यात आली आहे. पत्नी स्मिता झा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत.
सोनू ऑटो रिक्षा चालवतो. सहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न स्मिता हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतरच दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. भांडणांवरुन पंचायतदेखील बोलवण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यात सर्व काही सुरळीत सुरू होते. दोघांना दोन मुलं झाली. हरिओम नावाचा एक शिक्षक मुलांना ट्युशन शिकवण्यासाठी यायचा. स्मिता आणि हरिओम यांच्या त अनैतिक संबंध निर्माण झाले. एकदिवश सोनूने दोघांना खोलीत नको त्या अवस्थेत पाहिले आणि पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली. हा वाद अखेरपर्यंत सुरू होता.
शुक्रवारी साधारण 12 वाजता सोनू रिक्षा चालवून घरी आला. तोपर्यंत घरातील सर्वजण झोपले होते. सकाळी उठून बघितले तर सोनूच्या खोलीत त्याचा मृतदेह पडलेला होता. तर स्मिता एका कोपऱ्यात बसली होती. जेव्हा सोनूच्या घरच्यांनी जवळ जावून पाहिलं तर त्याच्या गळ्यावर निशाण होते.
स्मिताने पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, स्मिता आणि हरिओम दोघंही खोलीत नको त्या अवस्थेत होते. रात्री सोनू घरी आला तेव्हा त्याने दोघांना पाहिले तेव्हा सोनूने हरिओम आणि स्मिता दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र सोनू नशेत होता याचाच फायदा घेत हरिओम आणि स्मिता यांनी केटल, काठीने मारहाण त्याला मारहाण केली. इतकंच नव्हे तर विजेच्या तारेने गळा आवळला. अखेर सोनूचा मृत्यू झालाय का हे पाहण्यासाठी त्यांनी विजेचा शॉकदेखील दिला.
पत्नी आणि तिच्या प्रियकराची अमानुषता इथवरंच नाही थांबली र स्मिता आणि हरिओमने सोनूच्या मृतदेहासमोर शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर हरिओम फरार झाला. सकाळी स्मिताने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली की सोनूचा मृत्यू विजेचा शॉक लागल्याने झाला. मात्र सोनूच्या गळ्यावर असलेले निशाण पाहून त्याच्या वडिलांना संशय आला तेव्हा त्यांनी लगेचच पोलिसांना बोलवले. पोलिसानी स्मिताला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. स्मिताने कबुली देताच तिला अटक करण्यात आली असून हरिओम फरार आहे.