उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी लठ्ठ (Fat) असल्यामुळे राग अनावर झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पत्नीचे म्हणणे आहे की, तिचे वजन जास्त असल्याने तिला सतत टोमणे मारले जातात.
मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाणे हद्दीतील झाकीर कॉलनीत राहणाऱ्या नजमासोबत हा विचित्र प्रकार घडला आहे. नजमाने सांगितले की ती लठ्ठ असल्याने पतीने घटस्फोट दिला आहे. नजमाने सांगितले की मी लठ्ठ झाले एवढीच माझी चूक होती.
त्यानंतर नजमाच्या पतीने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नजमाने सांगितले की नोटीस पाहिल्यानंतर तिने पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पतीने उत्तर दिले की तू जाड झाली आहेस आणि मी तुला घटस्फोट देत आहे.
पतीचा हा निर्णय ऐकून पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. अशा प्रकारे कोणी नाते संपवत असेल तर त्याची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
लिसाडी गेट पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नजमाने सांगितले की 8 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. नजमाने सांगितलं की तिला एक मुलगाही आहे. नजमाने सांगितलं की, एका महिन्यापूर्वी पतीने तिला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं आणि तलाखची नोटीस पाठवली. तलाखचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा पतीने सांगितलं की,तू लठ्ठ आहेस त्यामुळे तुला तलाख देत आहे.
पत्नी लठ्ठ असल्याने पतीला राग अनावर; उचललं टोकाचं पाऊल
Updated: Sep 02, 2022, 03:19 PM IST
पत्नी लठ्ठ असल्यामुळे राग अनावर झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.