Marathi News> भारत
Advertisement

'3 दिवस एकच अंडरवेअर घालतोस, टॉवेल...', पत्नीचं Divorce लेटर Viral; म्हणे, 'तुझ्याशी माझा...'

पतीच्या सवयींनी बेजार झालेल्या पत्नीने थेट पत्र लिहून घटस्फोट दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. यामध्ये पत्नीने घटस्फोटाची जी कारणे दिली आहे, ती वाचून तुम्हाला वाटेल घटस्फोट यामुळे देखीलही होतो? 

'3 दिवस एकच अंडरवेअर घालतोस, टॉवेल...', पत्नीचं Divorce लेटर Viral; म्हणे, 'तुझ्याशी माझा...'

नवरा-बायको हे नातंच असं आहे ज्यामध्ये वाद हा असतोच. अनेक बातम्यांमधूनही वाचतो, ऐकतो की, पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. पण जेव्हा हेच नातं घटस्फोटासारख्या टोकदार वळणावर पोहोचतं तेव्हा. तेव्हा त्या नात्यातील गांभीर्य आणि त्याची वेगळी बाजू समोर येते. 

सामान्यपणे पती-पत्नीच्या वादाची कारणे ही घरगुती हिंसाचार, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक कलह किंवा विवाहबाह्य संबंध ही कारणे आहेत. आता समोर आलेला खटला वाचल्यानंतर, तुमचे डोके चक्रावून जाईल. 

हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नवऱ्याच्या काही विचित्र स्वभावामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. एका पत्नीने आपल्या नवऱ्याला घटस्फोटाचे पत्र लिहीले आहे. यामध्ये पत्नीने घटस्फोटाचे कारण सांगितलं आहे, जे ऐकून प्रत्येकाला पहिलं हसू आवरणार नाही. मग प्रश्न पडेल की, यामुळे ही महिला घटस्फोट घेत आहे. युझर्स देखील घटस्फोटाचे पत्र वाचून हैराण झाले आहे. असं लेटर लिहून कोण घटस्फोट घेतो, असा सवाल प्रत्येकाला पडला आहे. 

एकच अंडरवेअर 3 दिवस ते अगदी टॉयलेट फ्लशकरेपर्यंत.... 

एका पत्नीने तिच्या पतीला घटस्फोट पत्र लिहिले आहे. तिने लिहिले आहे, 'प्रिय अंकित, तू "प्रिय" या शब्दाला पात्र नाहीस. मी तुला कंटाळली आहे. मी आता ते सहन करू शकत नाही, मी हे लग्न आणखी टिकू शकत नाही. तू आंघोळ करत नाहीस, तू तीन दिवस तीच अंडरवेअर घालतोस आणि ज्या दिवशी तू चुकून आंघोळ करतेस, तेव्हा तू टॉवेल बेडवर ठेवतोस. तुला पैशांची अजिबात किंमत नाही, तू ८० हजारांचा नथिंग फोन विकत घेतलास, ज्याचे नावच नथिंग आहे, तो काय फीचर्स देईल. तू फ्लशही करू शकत नाहीस, तू मूर्ख आहेस! माझा वकील तुला घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवेल. बाय.'

युझर्सचे मजेदार कमेंट्स 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा घटस्फोट पत्र अनेक हँडलवरून पोस्ट केलं जात आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. युझर्स त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, हस्ताक्षर खूप सुंदर आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ब्रँड प्रमोशनची पद्धत थोडी कॅज्युअल आहे, कृपया लाज बाळगा. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, तुम्हाला ब्रेस्ट फ्रेंड हवा आहे का?

Read More