मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात जंगली प्राण्यांचा व्हिडीओ म्हटलं की, बऱ्याच लोकांना ते पाहायला फार आवडतं. जेव्हा सोशल मीडियाचा काळ नव्हता तेव्हा आपल्याला टीव्हीवरती किंवा डिस्कवरी वरती जंगली प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळायचे. परंतु आता सोशल मीडियावर आपल्या सगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामध्ये जंगली प्राण्याचे व्हिडीओ देखील असतात.
सध्या असाच एक जंगली प्राण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे आणि यामागचं कारण आहे, दोन शिकाऱ्यांची लढाई.
आपण बऱ्याचदा हे पाहातो की, मोठे शिकारी जसे की, वाघ, बिबट्या, सिंह इत्यादी आपलं पोट भरण्यासाठी जंगलातील प्राण्यांचा शिकार करतात. ते बऱ्याचदा शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. पण मांसाहारी प्राण्यांच्या वाट्याला ते कधीच जात नाही.
परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ काही वेगळा आहे. कारण या व्हिडीओमध्ये दोन शिकारी म्हणजे वाघ आणि बिबट्या एकमेकांशी लढत आहेत.
दोन्हीही प्राणी तेवढेच चपळ आणि तेवढेच ताकदवर असल्यामुळे या दोघांपैकी कोण जिंकेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्यामुळे लोकं मोठ्या कुतुहलाने वाघ आणि बिबट्या यांच्या भांडणाचा व्हिडीओ पाहात आहेत.
Tiger & Leopard fight from Ranthambore. Ever seen something like this before ?
— Trikansh Sharma (@trikansh_sharma) March 22, 2022
Source - unknown. pic.twitter.com/cJv3a1rGPs
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाघाच्या एकाच फटक्यात बिबट्या उलटा होतो. त्याच्यावर वाघ पंजाने देखील वार करतो. वाघाच्या या गोष्टीमुळे हे तर लक्षात येते की, वाघ किती शक्तीशाली आहे. शेवटी वाघ या बिबट्याला काहीही न करता तेथून लांब निघून जातो.
बऱ्याचदा हा व्हिडीओ पाहातान असे देखील वाटत आहे की, हे दोघेही खेळत आहेत. परंतु जे काही असो या दोघांचा व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा उभा करणारा आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर Trikansh Sharma नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.