जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भयावह दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये शहीद झालेल्या भारतीय नौसेनाचे अधिकारी विनय नरवाल यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी नवविवाहित पत्नी हिमानी दिल्ली एअरपोर्टवर पतीचं पार्थिव पाहून कोलमडून गेली. पत्नीने पतीच्या शवपेटीला बिलगून हंबरडा फोडला. यावेळी ती एकच सवाल विचारत होती की,'मी आता कशी जगू?'
"Hope his soul rests in peace..": Widow of deceased Navy officer Lt Vinay Narwal at his wreath laying ceremony
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2025
Read @ANI Story | https://t.co/x44QO2WjIp#NavyOfficer #LtVinayNarwal #WreathLayingCeremony #Pahalgam #TerrorAttack pic.twitter.com/vXnbF7QPYD
या दृश्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. लग्न होऊन अवघे सातच दिवस झाले होते. 16 एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले. पण कोणाला माहित होते की एका आठवड्यात हे नवविवाहित जोडपे कायमचे वेगळे होईल.
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal's wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack
— ANI (@ANI) April 23, 2025
The couple got married on April 16. pic.twitter.com/KJpLEeyxfJ
लेफ्टनंट नरवाल यांचे पार्थिव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच कुटुंबातील सदस्य, लष्करी अधिकारी आणि तेथे उपस्थित असलेले सामान्य लोक दुःखी झाले. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि अभिवादन केले. त्यांच्यासोबत हवाई दल प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
Navy Chief Admiral Tripathi pays tribute to Lieutenant Vinay Narwal, killed in Pahalgam attack
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2025
Read @ANI Story | https://t.co/BaG1t8lW6l#DineshKTripathi #PahalgamAttack #VinayNarwal #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/22YXwY89L6
कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती देणारा एक आशादायक अधिकारी देशाने गमावला आहे. दुसरीकडे, पत्नीचे आनंदी वैवाहिक जीवन सुरू होण्यापूर्वीच कोलमडून गेले. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हौतात्म्याने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की किती तरुण सैनिक आपल्या सुरक्षेसाठी शांतपणे आपली स्वप्ने अर्पण करतात. त्यांच्या अंत्ययात्रेला भेट देण्यासाठी आलेले लोक केवळ दुःखी नव्हते तर देशाला असे शूर पुत्र मिळाल्याचा अभिमानही बाळगून होते.