Marathi News> भारत
Advertisement

मासिक पाळी आल्याने देवीचे व्रत हुकले; महिलेने स्वतःला संपवले

Crime News In Marathi: मासिक पाळी आल्यामुळं महिला दुखी झाली होती. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले असून तिचा मृत्यू झाला आहे

मासिक पाळी आल्याने देवीचे व्रत हुकले; महिलेने स्वतःला संपवले

Crime News In Marathi: घरगुती ताण-तणाव, भांडणे, परीक्षेची भिती यासगळ्यामुळं  आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका महिलेने एका क्षुल्लक कारणावरुन जीव दिल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या झांशी येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 36 वर्षांच्या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. 

महिलेच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 1 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान महिलेला मासिक पाळी आली. पाळीच्या दिवसांत नवरात्रीचे व्रत आणि पूजा करु शकत नसल्याने ती खूप दुखी होती. याच नैराश्यातून तिने विष प्यायले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

झांशी जनपथच्या शहर कोतवालीअंतर्गंत पन्ना लाल गोला कुआं मोहल्ल्यात 36 वर्षीय प्रियंशा सोनी तिच्या पती मुकेश सोनी याच्यासह राहत होती. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी तीन वर्षांची तर धाकटी दीड वर्षांची आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने नवरात्रीसाठी ती नेहमीच खूप उत्सुक असायची. नवरात्री सुरू होण्यापूर्वी ती आधीपासूनच तयारी करायला घ्यायची. मात्र ज्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता तेव्हा तिला मासिक पाळी आली. त्यामुळं ती व्रतपण करु शकली नाही आणि देवीची पूजादेखील करता आली नाही. 

मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशा खूप दुखी होती. तिला खूप समजावले मात्र तिने काहीच ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी तो जेव्हा दुकानात गेला तेव्हा तिने विष प्यायलं. जेव्हा मुकेशला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

केश सोनी म्हणाले की, प्रियांशा म्हणायची की जेव्हा देवी माता विराजमान होईल तेव्हा ती पूजा करेल. तिने मला पूजेचे सामान आणायला सांगितले होते. मी सामान आणले आणि तिला दिले. पण तिला नवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी आली, त्यानंतर प्रियांशाने दुःखाने सांगितले की तिने वर्षभर त्यासाठी तयारी केली होती पण आता ती पूजा करु शकणार नाही. त्यानंतर तिने असे टोकाचे पाऊल उचलले.  या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला भरला आणि नंतर तो शवविच्छेदनासाठी  पाठवण्यात आला आहे.

Read More