Marathi News> भारत
Advertisement

दोन बायका भांडणं ऐका! बसच्या सीटवरून राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; पाहा Video

Delhi Bus viral video : झालं असं की, दिल्लीच्या बसमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशी आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी बसमध्ये दोन महिल्या शेजारी थांबल्या होत्या...

दोन बायका भांडणं ऐका! बसच्या सीटवरून राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; पाहा Video

Woman fight in Bus Video : बायकांच्या भांडणात पडायलाच नको राव, लय कीटकीट असती, असं नेहमी पुरूष मंडळींच्या तोंडून तुम्हीही ऐकलं असेल. मुलींचा स्वभाव कोणाला ओळखू आलाय? त्यांच्या मनात काय चालतं हे पुरूषांना कळण्याचा मार्ग नसतो. दोन मिनीटांपूर्वी गप्पा मारत बसलेल्या महिला कधी एकमेकींच्या झिंज्या उपटतील (Woman fight) याचा काही नेम नाही. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही (Viral Video) हसू आल्याशिवाय राहणार नाही.

दिल्लीतील (Delhi Bus) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोन दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये महिला प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत होतं. त्याला कारण काय होतं. तर चुकून लागलेली लाथ. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतोच पण महिलांना एक्सक्युज नको असतो. मग काय दे दणादण... अशातच आता दिल्लीच्या सरकारी बसमधील (Delhi Bus viral video) भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रवासामध्ये एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असतं. मात्र, अनेक गैरसमज आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात भांडणं होताना दिसतात... तर झालं असं की, दिल्लीच्या बसमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशी आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी बसमध्ये दोन महिल्या शेजारी थांबल्या होत्या. त्यावेळी महिला एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्याचवेळी सीटवर बसलेला एक व्यक्ती उठतो. त्यानंतर दोन्ही महिलांनी सीटवर बसण्याचा दावा करतात. त्यानंतर त्यांच्यात सुरू होते, ती शाब्दिक भांडणं. हळूहळू वाद एवढा पेटतो की, महिला एकमेकींच्या मांडीवर बसतात. त्यानंतर दोघींनी कहरच केला. एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शिवीगाळ सुरू केली.

पाहा VIDEO

दरम्यान, याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दोघींची भांडणं पाहिली. त्याने त्यांच्या भांडणात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलांनी या पुरूषाचं देखील ऐकलं नाही. त्यानंतर कंडक्टरने बस बाजूला घेतली अन् भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुखदर्शन म्हणून उभ्या असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शुट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Read More