Love Triangle Murder Case: उत्तर प्रदेशमध्ये एक भयानक घटना घडली आहे. पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीला पत्नीने आणि तिच्या प्रियकराने जीवे ठार मारले आहे. धक्कादायक म्हणजे या जोडप्याला तीन मुलं आहे. जेव्हा मुलांना आईच्या कृत्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तिला तुरुंगात पाठवा, असा आदेशच दिला.
बुधवारी अलीगढ येथे ही घटना घडली आहे. पत्नीने पतीची गोळी झाडून हत्या केली आहे. बीना गेल्या आठ वर्षांपासून तिच्या पतीला धोका देत होती. तर पती दिल्लीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होता. कधी आठवड्याला तर कधी दहा दिवसांनी घरी येत होता. बिनाचे तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणावर प्रेम बसले होते. धक्कादायक म्हणजे, बिना जेव्हा प्रियकराला घरी भेटायला बोलवायची तेव्हा तीन मुलं आणि पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनाचे घरापासून वीस मीटर लांब राहणाऱ्या मनोजसोबत तिचे प्रेमसंबंध होते. शेजारी असल्यामुळं मनोजही तिच्या घरी सतत येणेजाणे होते.
बिना आणि मनोज यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गावकऱ्यांना लागली . त्यामुळं परिसरात सगळीकडे चर्चा होऊ लागली. सुरेश जेव्हा दिल्लीहून आला तेव्हा त्याने पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही. तेव्हा अखेर सामाजिक दबावामुळं गावात पंचायत करण्यात आली. पंचायतने मनोज आणि बिना यांना वेगळे होण्यास सांगितले. मात्र तरीही ते रात्री गपचुप किंवा गावाबाहेर भेटू लागला. सुरेश आणि मुलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून ती मनोजला भेटायची.
तीन दिवसांपूर्वीच सुरेश दिल्लीहून गावी आला होता. तो बुधवारी परत जाणार होता. सुरेश घराच्या पडवीत बसलेला असतानाच मनोजने त्याच्यावर बंदूक ताणून धरली अन् त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सुरेशचा मोठा भाऊ विजयने मनोजला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मनोजने त्याच्यावरही गोळ्या झाडल्या.या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीनानेच मनोजला सुरेशला मारण्यास सांगितले होते. दोघांनी हा प्लान केला होता.स्वतः मनोज आणि बिना यांनी गुन्हा कबुल केला आहे.
घटनेच्या आधी बिनानेच पतीला घराच्या बाहेर बसायला सांगितले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून ती बाहेर आली आणि मनोजला सांगितले की, हव्या तितक्या गोळ्या झाड पण आज तो वाचला नाही पाहिजे. बिनाने सकाळपासून हत्येची प्लानिंग केली होती. मुलांनाही जबरदस्ती शाळेत पाठवले होते.