Woman Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या महिलेने तिच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितलं आहे. ही महिला विवाहित असून लग्नानंतर ती प्रियकरासोबत पळून गेली. एवढंच नाही ही महिला त्यानंतर एक नाही दोन नाही चौघांच्या प्रेमात पडली. तिने तिची ही अजब प्रेम कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही प्रेम कहाणी आहे उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील. नेमकं काय प्रकरण आहे, पाहूयात.
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणाऱ्या या महिलेचं लग्न हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील तरुणाशी झालं होतं. लग्नानंतर तिचा संसार सुखात सुरु होता, पण त्या परिसरात आलेल्या एका मजुराच्या प्रेमात ती पडली. संवादातून सुरु झालेली प्रेम कहाणी भेटीपर्यंत पोहोचली. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ती विवाहित महिला नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. पण हे नातं फार काळ टिकलं नाही, सहा महिन्यांतच ही महिला प्रियकराच्या चुलत भावाच्या प्रेमात पडली.
यानंतर, ती महिला तिच्या नवीन प्रियकरासोबत आनंदाने राहू लागली. पण याही नात्याला काही अर्थ नव्हता. इथेच तिची प्रेम कहाणी थांबत नाही, यानंतर, ती महिला मुसाझग पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात पोहोचली. येथे ती महिला तिसऱ्या प्रियकराच्या मेहुण्याच्या चुलत भावाच्या प्रेमात पडली आणि दोघेही उजनी परिसरातील एका गावात स्थायिक झाले. या घटनेनंतर, तिसऱ्या प्रियकराच्या मेहुण्याने बदायूं जिल्ह्यातील मुसाझग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि महिलेच्या सुटकेची मागणी केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, महिलेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या चौथ्या प्रियकरासोबत राहण्यावर ठाम असल्याचे सांगत आहेत. व्हिडीओमध्ये ती महिला म्हणत आहे की, ती आता तिच्या चौथ्या प्रियकराला सोडणार नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात या प्रेमकथेची बरीच चर्चा सुरु आहे.