Marathi News> भारत
Advertisement

महिलेचं रौद्ररुप! 90 सेकंदात लगावल्या 17 कानशिलात, VIDEO पाहिलात का?

महिलेची दादागिरी की रिक्षावाल्याची बदसुलूकी? VIDEO पाहून तुम्हीचं ठरवा 

महिलेचं रौद्ररुप! 90 सेकंदात लगावल्या 17 कानशिलात, VIDEO पाहिलात का?

नोएडा : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका कार चालक महिला आणि ई-रिक्षा चालकामध्ये तुफान भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत महिलेने रिक्षा चालकाला तुफान मारहाण केली आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय ते जाणून घेऊयात.   

व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला ई-रिक्षा चालकाला बेभान कानशिलात लगावताना दिसत आहे. त्याची कॉलर पकडून त्याला खेचतेय. आणि आपल्या कारसमोर नेत त्याला एका मागून एक कानाखाली मारतेय.महिलेची दादागिरी हा रिक्षाचालक निमुटपणे सहन करत आहेत. महिला त्याला इतका चोप देतेय मात्र रिक्षाचालक तिला अजिबात प्रत्युत्तर देत नाहीए. 

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांना महिलेचं हे वागण पटलं नाहीए. तर काहींनी महिलेच्या या वागण्याचं समर्थन केलं आहे.     

नेमकी घटना काय?
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये ई-रिक्षा चालकाच्या रिक्षाचा कारला स्पर्श झाला. या घटनेने संतप्त होत रिक्षा चालकाला मारायला सुरुवात केली. महिलेने अवघ्या 90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 कानशिलात लगावल्या. महिलेने त्याच्याकडून पैसे आणि मोबाइलही हिसकावून घेतल्याचा आरोप होत आहे.  

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ नोएडा पोलिसांना टॅग केला आहे. याप्रकरणी पोलीस का भूमिका घेतात याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read More