Marathi News> भारत
Advertisement

महिलेने बुक केली Uber Cab, ड्रायव्हरच्या रिप्लायने तुम्ही व्हाल हैराण


सोशल मीडियावर सध्या अशीच एक कॅब ड्रायव्हरसोबतचा किस्सा चांगलाच व्हायरल होतोय.

महिलेने बुक केली Uber Cab, ड्रायव्हरच्या रिप्लायने तुम्ही व्हाल हैराण

Viral News : भारतात ऑनलाईन कॅबचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कॅब बुक करण्यापासून कॅब येईपर्यंतच्या दरम्यान बरीच मोठी आणि प्रसंगी किचकट वाटणाऱ्या प्रक्रियेला सगळेच सामोरे जातात. त्यात काहीवेळा कॅब ड्राईव्हर स्वत: राईड कॅन्सल करतात किंवा फोन केल्यावर तुम्हाला कॅन्सल करण्यास सांगतात.

कॅब अखेरच्या क्षणात रद्द केली जाण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र तुमच्यासोबत काही आगळा वेगळा किस्सा घडला आहे का?

सोशल मीडियावर सध्या अशीच एक कॅब ड्रायव्हरसोबतचा किस्सा चांगलाच व्हायरल होतोय. कॅब बुक केल्यानंतर चक्क कॅब ड्रायव्हरला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

काय म्हणाला कॅब ड्रायव्हर?

करिश्मा मेहरोत्रा नावाच्या महिलेने ट्विटद्वारे एक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये तिने ऊबर ड्रायव्हरला मेसेजमार्फत आप आ रहे हो ना? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ड्रायव्हरने चक्क म्हटलंय की, 'आऊंगा 100% , एक पराठा खा रहा हूँ, आधाही बचा है'.

ड्रायव्हरच्या उत्तरामुळे करिश्मा सुद्धा आश्चर्यचकीत झाली. 'मला जीवनात अशा प्रकारचा प्रामिणकपणा शिकायचा आहे', असं करिश्माने स्क्रीनशॉट शेअर करताना म्हटलं.

नेटकऱ्यांकडून प्रामाणिक ड्रायव्हरचं कौतुक

कॅब ड्रायव्हरचं उत्तर वाचून नेटकऱ्यांकडून त्याचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर, ड्रायव्हरसोबत करिश्माचंही कौतुक करण्यात आलंय. 'जसं तुम्ही त्याला समजून घेतलं, तसं इतरांनाही घेतलं तर चांगलं, असं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे काही नेटकऱ्यांनी त्यांच्यासोबत घडलेले किस्से शेअर केले आहेत. 

Read More