Marathi News> भारत
Advertisement

महाकाल मंदिराबाहेर फ्री-स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

...

महाकाल मंदिराबाहेर फ्री-स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

भोपाळ : मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराबाहेर दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. फूल आणि प्रसाद वाटपावरुन दोन गटात तुफान राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका युवकाने महिलांनाही अमानुष मारहाण केली. महिलांचे केस ओढत हा युवक मारहाण करत असल्याचे या दृष्यांमध्ये पाहायला मिळतंय. शिवाय यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली.

चप्पल, बूटांचा मारा आणि दगडफेकीमुळे हा वाद चांगलाच पेटला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हा वाद सुरु होता. मात्र, हा वाद सोडवण्यासाठी उपस्थितांपैकी कुणीही पुढे सरसावलं नाही. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. तसंच घटनास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलीस स्टेशन असूनही बराच काळ पोलीस सुद्धा तिथे पोहचले नाही. 

या ठिकाणी अशाप्रकारे फूल, प्रसाद विक्री आणि चप्पल-बूट ठेवण्याबाबत विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. प्रत्येक दुकानदार इथे येणाऱ्या भाविकांना आपल्या दुकानातून साहित्य विकण्याचा प्रयत्न करत असतो. यातूनच अनेकदा दुकानदारांमध्ये वाद होण्याचे प्रकार याआधीही महाकाल मंदिराबाहेर घडले आहेत. 

Read More