होळीच्या पवित्र सणाला पतंजली विश्वविद्यालाच्या खेळातील प्रांगणात विश्वविद्यालयाचे कुलाधिपती स्वामी रामदेव तसेच कुलपति आचार्य बालकृष्ण यांच्या सानिध्यात एका विशेष 'होलीकोत्सव यज्ञ आणि फुलांची होळी'चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळ्या देशवासियांना वासंत नवसस्येष्टिच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होलीकोत्सवच्या स्वामी रामदेव यांनी सांगितले की, होळी हा फक्त रंगांचा किंवा उत्साहाचा सण नाही. तर तो सामाजिक सौहार्द, प्रेम, बंधुता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी अशी प्रतिज्ञा करण्यात आली की, आपल्याला निंदा, भान हरपणे तसेच स्वतःला विसरुन जाणे यासारख्या गोष्टी घडणार नाही, याचे भान ठेवे महत्त्वाचे आहे. आपण नेहमी सत्यात स्थिर राहिले पाहिजे आणि आपल्या सत्याच्या मार्गावर, शाश्वत मार्गावर, वैदिक मार्गावर, ऋषींच्या मार्गावर, शुद्धतेच्या मार्गावर पुढे जात राहिले पाहिजे, नवीन पायऱ्या चढत राहिले पाहिजे आपण सनातन संस्कृतीचा प्रत्येक उत्सव योग आणि यज्ञाने साजरा करतो. योग आणि यज्ञ हे आपल्या शाश्वत संस्कृतीचे जीवन घटक आणि आत्मा घटक आहेत. स्वामीजींनी सर्व देशवासीयांना आवाहन केले की, गांजा आणि दारूच्या नशेमुळे हा सण बिघडू शकतो. ते समाजासाठी हानिकारक आहे.
यावेळी आचार्य बाळकृष्ण जी म्हणाले की, होळी हा अहंकाराचा त्याग करण्याचा सण आहे. हा सण होलिकेच्या रूपात आपल्यातील वाईट भावना, हिरण्यकश्यपूला जाळण्याचा उत्सव आहे. होळीच्या दिवशी, तुमचे सर्व मतभेद विसरून जा आणि बंधुत्वाच्या रंगात रंगून या पवित्र सणाला अर्थपूर्ण बनवा. त्यांनी देशवासीयांना होळीचा सण पूर्ण शुद्धतेने साजरा करण्याचे आवाहन केले. होळीला शेण, चिखल आणि रासायनिक रंग वापर न करता फक्त फुले आणि नैसर्गिक गुलालने होळी खेळण्याचे यावेळी आवाहन केले. आचार्यजी म्हणाले की, रसायने असलेल्या रंगांमुळे डोळे आणि त्वचेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
आचार्यजींनी होळी खेळण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, होळी खेळण्यापूर्वी तुमच्या शरीराच्या उघड्या भागांवर मोहरी किंवा खोबरेल तेल किंवा कोल्ड क्रीम लावा; यामुळे हानिकारक रासायनिक रंगांमुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
कार्यक्रमात पतंजली विद्यापीठाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, युनिट प्रमुख, विभाग प्रमुख, पतंजली संस्थेशी संलग्न सर्व युनिटचे कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, संन्यासी बंधू आणि साध्वी भगिनी उपस्थित होते.