लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर राजकारणही तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बुलंदशहर घटनेनंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका', असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
CM श्री @myogiadityanath जी के नेतृत्व में उ.प्र. में काननू का राज है। यहाँ कानून तोड़ने वालों से सख्ती से निपटा जाता है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 28, 2020
बुलन्दशहर की घटना में त्वरित कार्रवाई हुई और चंद घंटों के भीतर ही आरोपी को गिरफ्तार किया गया।
महाराष्ट्र संभालें,यूपी की चिंता न करें।#योगी_हैं_तो_न्याय_है
'पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्याला राजकारण म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या दृष्टीबद्दल काय बोलणार? तुमचं हे वक्तव्य म्हणजे तुमच्या बदलत्या राजकीय संस्काराची ओळख करुन देत आहे. हे तुष्टीकरणाचं प्रवेशद्वार आहे, यात शंका नाही,' अशी टीकाही आदित्यनाथ यांनी केली आहे.
श्री @rautsanjay61 जी,पालघर में हुई संतों की वीभत्स हत्या पर चिंता व्यक्त करने को राजनीति कहने वाली आपकी वैचारिक (कु)दृष्टि को क्या कहा जाए? कुसंस्कारों में 'रक्त स्नान' करती आपकी टिप्पणी,आपके बदले हुए राजनीतिक संस्कारों की परिचायक है। निःसंदेह यही तुष्टिकरण का प्रवेश द्वार है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 28, 2020
'संजय राऊत यांना संतांची हत्येवर चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, कारण पालघरमधले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. राजकारण कोण करत आहे?' असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.
श्री @rautsanjay61 जी, संतो की बर्बर हत्या पर चिंता करना राजनीति लगती है?
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 28, 2020
उ.प्र. के मुख्यमंत्री जी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को फोन किया क्योंकि पालघर के साधु निर्मोही अखाड़ा से संबंधित थे।
सोचिये, राजनीति कौन कर रहा है?
'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असा टोला संजय राऊत यांनी हाणला होता.
अत्यंत निघृण आणि अमानुष!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020
ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे.
सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर
कठोर कारवाई करतील.