झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील भुरकुंडा ओपी क्षेत्रात एका तरुणाने ऑपरेशन सिंदूरसंदर्भात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाकला होता. यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी नाराजी जाहीर केली होती. तसंच पोस्ट लिहिणाऱ्या साहिलविरोधात लेखी तक्रार दिली होती. त्याला अटक केली जावी अशी मागणी करण्यात आली होती.
तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेत साहिल अली नावाच्या तरुणाला अटक केली होती. याप्रकरणी भुरकुंडा ओपी पोलीस स्थानकाचे इंचार्ज निर्भय गुप्ता यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर एक देशविरोधीत व्हिडीओ व्हायरल होत होता. याप्ररकरणी विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपीची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. विहिप दुर्गा वाहिनी जिल्हाध्यक्ष रामगढ अनामिका श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे की, "माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही भारतात राहत असतानाही तोंडून पाकिस्तानचं नाव कसं काय निघतं? ही मानसिकता नेमकी येते कुठून? अखेर या लोकांना कोण भडकवत आहे? याचाही तपास झाला पाहिजे".
पाकिस्तान लष्कराने भारताच्या पश्चिमेकडील भागावर हल्ला केला. श्रीनगर ते नलियादरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एलओसीवर विशेषतः हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने लांब पल्ल्याची शस्त्रे, ड्रोन आणि स्वार्म्सचा वापर केला. पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी वाजता पाकिस्तानने उच्च वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र वापरून पंजाबमधील एअर बेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान मुद्दाम भारतीय संरक्षण स्थळांना लक्ष्य करत आहे, असं लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.