Marathi News> भारत
Advertisement

'मला तिने सांगितलं होतं की...', YouTuber ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'ती घरात असताना...'

Youtuber Jyoti Malhotra Arrest: ज्योती मल्होत्राने यूट्यूब व्हिडिओ बनवले होते आणि पाकिस्तानला भेट दिली होती, असा दावा हरीश मल्होत्रा यांनी केल्यानंतर हे विधान करण्यात आलं आहे.   

'मला तिने सांगितलं होतं की...', YouTuber ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'ती घरात असताना...'

Youtuber Jyoti Malhotra Arrest: ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावा तिचे वडील हरिश मल्होत्रा यांनी केला आहे. तसंच ज्योतीने आपल्याला दिल्लीला जात असल्याचं सांगितलं होतं, तिने पाकिस्तान दौऱ्याचा कधीही उल्लेख केला नाही असंही ते म्हणाले आहेत. ज्योतीला अधिकृत गुपित कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्योती मल्होत्राच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपवर संशयास्पद सामग्री आढळल्याचा दावा केला आहे. 

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या आपल्या मुलीने यूट्यूब व्हिडिओ बनवले होते आणि पाकिस्तानला भेट दिली होती, असा दावा हरीश मल्होत्रा यांनी केल्यानंतर आता हे विधान केलं आहे. पोलिसांनी जप्त केलेले फोन परत करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

त्यांनी सांगितलं की, गुरुवारी पोलीस पहिल्यांदा त्यांच्या घरी आले. पोलिसांनी त्यांची बँक कागदपत्रे, फोन, लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त केले आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी दिल्लीला येत असे आणि गेल्या चार-पाच दिवसांपासून हिसारमध्ये आहे.

"मला काहीच माहिती नव्हतं. आपण दिल्लीला जात असल्याचं तिने सांगितलं होतं. तिने मला काहीच सांगितलं नाही. तिचे कोणतेही मित्र कधी आमच्या घरी आले नाहीत. काल पोलीस तिला घेऊन आले होते. ती आपले कपडे घेऊन निघून गेली. ती माझ्याशी काहीच बोलली नाही. मलाही काय बोलावं कळत नव्हतं. ती घऱात व्हिडीओ बनवायची. मी कधीच म्हटलं नाही की, ती पाकिस्तानला जायची. ती मला आपण दिल्लीला जात आहोत असं सांगायची. माझ्या काही मागण्या नाहीत. जे काही व्हायचं, ते होणार आहे," असं ते म्हणाले आहेत. 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्योती 2023 मध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. या भेटीदरम्यान, ती मिशनमध्ये काम करणाऱ्या अहसान-उर-रहीम, ज्याला दानिश म्हणूनही ओळखले जाते, अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं वृत्त आहे. तपासकर्त्यांचा आरोप आहे की ती त्याच्या संपर्कात राहिली. ती दोन वेळा पाकिस्तानला गेली आणि पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांशी संबंधित व्यक्तींना भेटली.

तिच्या वडिलांनी मात्र ती युट्बूच्या कामानिमित्त परदेशात जात होती असा दावा केला आहे. "लॉकडाउनच्या आधी ती दिल्लीत काम करत होती. माझ्याकडे छोटा फोन असल्याने मी कधी तिचे व्हिडीओ पाहिले नाहीत. माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. मी स्वत: नाराज असून, गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहे," असंही त्यांनी सांगितलं.

हरीश मल्होत्रा ​​यांनी यापूर्वी एएनआयला सांगितलं होतं की, त्यांच्या मुलीने तिच्या चॅनेलसाठी पाकिस्तानमध्ये व्हिडिओ बनवले होते आणि प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. "तिने यूट्यूब व्हिडिओ बनवले. ती पाकिस्तान आणि इतर ठिकाणी जायची. जर तिचे काही मित्र तिथे असतील तर ती त्यांना फोन करू शकत नाही का?", अशी विचारणा त्यांनी केली. पोलिसांनी तिचे मोबाईल फोन, पासपोर्ट आणि बँक कागदपत्रे जप्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हिसारचे पोलीस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (पीआयओ) तिला अॅसेट बनविण्यासाठी तयार करत आहेत. त्यांनी खुलासा केला की ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली होती, ज्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा एक दौरा आणि चीनलाही प्रवास केला होता.

Read More